सर्वांनी (बौद्ध व मांग) आवर्जून वाचावा असा लेख
मातंग जातीच्या संबंधाने काही भ्रम आणि वास्तव - जी एस दादा कांबळे
    भारतातील महाराष्ट्र राज्य हे पुरोगामी राज्य म्हणून ओळखले जाते याच महाराष्ट्रात 1 जानेवारी 1818 रोजी भीमा कोरेगाव ची लढाई झाली. याच महाराष्ट्रात राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांनी 24 सप्टेंबर 1873 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. याच महाराष्ट्रात 2 जून 1902 रोजी मागासवर्गीयांसाठी शाहूराजांनी 50% टक्के आरक्षण घोषित केले. 13 ऑक्टोबर 1935 रोजी येवला येथे हिंदूधर्म त्यागण्याची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची घोषणा त्यानंतर कसबे, तळवडे, करकम, पुणे,अहमदनगर, मुंबई, अमरावती, नागपूर आदी ठिकाणी मातंग परिषदा घेऊन बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराने काय होणार आहे हे स्पष्ट केले होते. मांग आणि महार आजचा बौद्ध आणि मांग शब्दावर जोतिराव फुलेनी विशेष भर दिल्याचे त्यांच्या समग्र वांग्मय आत दिसून येते मुक्ता साळवे यांच्या निबंधांचे शीर्षक सुद्धा मांगमहाराच्या दुःखा विषयी निबंध असाच आहे.
 
मांग  आणि बौद्धांमधील साम्यस्थळे :

दोघांच्या वस्त्या  गावाच्या बाहेर एकमेका शेजारी आहेत. 

दोघांचा आहार सारखा होता, आहे.
हे दोघे अस्पर्श होते व आहेत ( आज वरवर अस्पर्शता दिसत नसली तरी व्यक्तिगत जीवनामध्ये तीव्र स्वरूपात आहे. )

दोघांचीही दैवत सारखी किंवा एकच होती 

पोतराज सोडणे, देवदासी सोडणे, वाघ्या मुरळी खंडोबा ला सोडणे या प्रथा दोन्ही जात होत्या.
 
गावगाड्यात दोघांच्याही कामाचा दर्जा सारखाच होता.

दोघांचेही सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक जीवन समान होते.

 सवर्ण समाजाकडून दिली जाणारी वागणूक दोघांनाही समान होती.

 एकूणच जन्मापासून ते मृत्यूपर्यंत चे  सर्वच व्यवहार समान होते.

14 ऑक्टोबर 1956 नंतर संपूर्ण जीवन प्रणाली मध्ये बदल झालेला असून काही गैरसमज निर्माण करण्यात आले आहेत मात्र वास्तव वेगळे आहे.

भ्रम :
     मातंग समाजाला वाटते की आमच्या संपूर्ण वाट्याचं आरक्षण बौद्धांनी घेतल्यामुळे त्यांचा सामाजिक, आर्थिक विकास झालेला आहे.

 वास्तव :
     आरक्षण खुलं होतं शिक्षण केलं होतं संस्था जिल्हा परिषद शाळा नगरपालिका महानगरपालिका या सर्व ठिकाणी अनुसूचित जातीतील सर्व जातींना मुक्त प्रवेश होता जे शिकले त्यांना नोकरी मिळाली उलट बौद्ध शिकली म्हणून बौद्धांनी तरी नोकऱ्या मिळाल्या तेथेही शिकले नसते तर इतर जातीचे लोक मारले असते म्हणून बौद्धांनी मातंगाचा घेतला असे म्हणणे म्हणजे वास्तव नाकारणे होय. भ्रम मातंग जातीची विरोधक किंवा दुश्मन बौद्ध लोक आहेत असा प्रचंड प्रमाणात गैरसमज तयार करण्यात आला.

भ्रम :
    *मातंग जातीचे विरोधक किंवा दुश्मन बौद्ध लोक आहेत असा प्रचंड प्रमाणात गैरसमज तयार करण्यात आला आहे.*
 
वास्तव :
   आजपर्यंत महाराष्ट्रात कोणत्याही गावात बौद्धांनी मातंगाची घरे जाळली नाहीत. मातंगाच्या महिलावर अत्याचार केलेला नाही. मातंगाच्या शेतीत गुरे सोडली नाहीत. मातंगाचे खुन केलेले नाही. उलट जेव्हा जेव्हा सर्वांना कडून मातंग जातीवर अन्याय अत्याचाराच्या घटना घडल्या त्या त्या वेळी बुद्धांच्या वेगवेगळ्या संघटनांनी मोर्चे, निदर्शने केली आहेत.
 दिलीप शेंडगे प्रकरणात भुतेगावी गावी सर्वात प्रथम रामदास आठवले, त्यानंतर जोगेंद्र कवाडे, प्रकाश आंबेडकर आदींनी भेटी देऊन निषेध केलेला आहे.
 औरंगाबाद जिल्ह्यात जेव्हा पाल येथे रोहिदास तुपे प्रकरण घडले तेव्हा औरंगाबाद मधील सर्व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते रस्त्यावर आले होते.

भ्रम
     *डॉ बाबासाहेब आंबेडकर बौध्दांचे आहेत, तर अण्णाभाऊ साठे, लहुजी साळवे मातंगाची आदर्श आहेत. असा गैरसमज असून त्या भावनेतून त्यांच्याकडे पाहिले जाते. बाबासाहेबांना भारतरत्न मिळाला तर अण्णाभाऊ साठे साहित्यरत्न म्हणण्याचा  बऱ्याच लोकांचा प्रयत्न आहे. रोजी साळवे महात्मा फुले यांचे गुरु असल्याचे ते मातंगाचा आदर्श आहेत या गैरसमजातून तुमचे बाबासाहेब तर आमचे अण्णाभाऊ, लहुजी साळवे अशी धारणा निर्माण करण्यात आली आहे. तुमचे अभिवादन जय भीम तर आमची जय लहुजी.*

वास्तव :
  या देशातील जे जे समुदाय वर्ण व्यवस्थेचे बळी आहेत, त्या सर्वांचा आदर्श बाबासाहेब आंबेडकरच असू शकतात. अण्णाभाऊ साठे प्रति आदर असणे यात काही गैर असू शकत नाही; परंतु 'तुमचे बाबासाहेब तर आमचे अण्णाभाऊ' असे समजण्यापर्यंत जी मानसिकता पोहोचली तर मात्र पूर्णतः धोकादायक आहे *'जय भीम' हा नारा कुणा एका जातीचा नसून ते समतेचा आंदोलन चालवणाऱ्या एका व्यवस्थेचा होणार आहे. जातवार अभिवादनाचे नारे काढून जाती व्यवस्था मजबूत होईल; परंतु जातीव्यवस्था खत्म होणार नाही. म्हणून ज्यांच्या डोक्यात आहे की जय भीम एक समूहाचा नारा आहे, ते तसं नाही.
भ्रम :
     *नागपूर, येवला, मुंबई ही स्थळ बौद्धांची आहेत, तर मांगिरबाबा, वरखेड, उरळीकांचन, पाल, काळुबाई, चंद्रपूर, तिरुपती ही स्थळ मातंगाची असून ती विकसित करावी त्याला सरकारी मदत मागावी जेणेकरून बुद्धाप्रमाणे मातंग सुद्धा एकत्र येतील.*

वास्तव :
नागपूर (दीक्षाभूमी), मुंबई (चैत्यभूमी), येवला (मुक्तीभूमी), महाड ,भीमा कोरेगाव (शौर्यभूमी) ही परिवर्तनवादी पार्श्वभूमी असलेली ठिकाण असून ती कोणा एका जातीची नाहीत तर ती आंबेडकरवादी लोकांचे प्रेरणा स्थळे आहेत. या ठिकाणी जेव्हा लोक एकत्र जमतात तेव्हा लाखो रुपयांची ग्रंथ, कॅसेट, फोटो, महापुरुषांच्या मुर्त्या, पुतळे, झेंडे,  लोक घेत असतात. तेथे कोणी नवस फेडायला जात नाही किंवा कोणी नवस करायला जात नाही. जो कधी न पाहिलेला माणूस हे सर्व पाहून चांगल्या विचारांनी प्रभावित होतो. उलट चंद्रपूर, मांगिरबाबा, वरखेड, पाल, खंडोबा येथे हजारो बकरे, कोंबडी कापली जातात. मांसाहारी जेवण म्हटल्यावर दारू आली दारू पिल्यानंतर थोडेफार तरी भांडणं होतच असतात म्हणून *'जातीसाठी माती खाण्यापेक्षा, तत्वासाठी जातीला मूठमाती'* देणे योग्य होईल.

भ्रम :
*काहींना वाटते बौद्धांच्या ताब्यात आर.पी.आय, रिपब्लिकन पार्टी असल्यामुळे प्रत्येक विधानसभा आणि  लोकसभेला बौद्धांसोबत प्रत्येक राजकीय पक्ष वाटाघाटी करतात. त्यामुळे त्यांचा विकास झाला आहे. त्यामुळे आपणही जर राजकीय पक्ष स्थापन केला तर आपल्यालाही वाटाघाटीसाठी राजकीय पक्ष बोलावतील.*

वास्तव :
  कोणतेही मोठे कार्य यशस्वी होण्यासाठी प्रथम समाज तयार करावा लागतो. समाज तयार करण्यासाठी एक तत्वज्ञान असावा लागत, ते तत्वज्ञान लोकांच्या गळी उतरवण्यासाठी एक नेता असावा लागतो. नेता म्हणून लोकांची मान्यता देण्यासाठी त्याला सर्वस्वाचा त्याग करावा लागतो. त्यानंतर लोक तयार होतात. बाबासाहेब आंबेडकरांनी विविध देशातील उच्च शिक्षण घेतल्यानंतर 1920 साली माणगावातून सार्वजनिक जीवनाची सुरुवात केली. लोकांना जागृत करण्यासाठी सभा, वृत्तपत्र आणि पुस्तक अशी संघटना बांधली. जवळपास 36 वर्षे अखंड प्रबोधन केलं. त्यात बहिष्कृत भारत, मूकनायक, समता, जनता, प्रबुद्ध भारत इत्यादी वृत्तपत्रातून प्रचंड प्रमाणात प्रबोधन केल्यामुळे लोकांमधील आत्मसन्मान जागा झाला. लोक स्वाभिमानी व आत्मनिर्भर बनले. म्हणून आर.पी.आय वाल्या सोबत राजकीय पक्ष वाटाघाटी करतात. फक्त पक्ष नोंदणीकृत केल्याने कोणी वाटाघाटी करत नाही. मातंगाचा पुढारी गावात आला तर मातंग लोक पाटलाच्या वाड्यावर विचारणा करण्यासाठी जातात. आमच्या जातीचा पुढारी आलेला आहे, आम्ही काय करायचं? मातंग जातीचा मेंदू आजही अन्याय अत्याचार करणाऱ्या पाटलांच्या हातात आहे. पदवीधर, पदव्युत्तर झालेल्या मातंग अधिकाऱ्यांना आंबेडकरी चळवळीचं मूल्य कळत नाही.

भ्रम :
   *निळा झेंडा बौद्धांचा असून कशाप्रकारे पिवळा झेंडा मातंगाचा झाला पाहिजे.*

वास्तव :
     निळा झेंडा कुणा एका जातीचा नसून ते आंबेडकरी विचारांचा आहे. ब्राह्मणीव्यवस्था पराभूत करून एक नवी समतावादी न्यायावर आधारित समाज रचना निर्माण करण्यासाठी आंबेडकरी तत्त्वज्ञान आणि निळा झेंडा आहे. आंबेडकरी तत्त्वज्ञान या देशात जातीविरहित समाजरचना निर्माण करण्यासाठी आंबेडकरी पर्वाचा उदय झालेला आहे. या देशात नव्या जाती निर्माण करणे व त्या मजबूत करणे हा त्यामागचा उद्देश नाही.

भ्रम :
    *मातंग समाजामध्ये अनेक उच्चपदस्थ अधिकारी, राजकीय पुढारी, संस्थाचालक, उद्योगपती आहेत. त्यांच्याकडे कोट्यावधी रुपयांची संपत्ती आहे. त्यांना भेटून त्यांनी कशामुळे जीवनात यशस्वी झाले. याबद्दल विचारणा केली असता ते म्हणतात, मी खूप अभ्यास केला, रात्रंदिवस मेहनत केली, खूप त्रास सहन केल्यामुळे मी इथपर्यंत पोहोचलो आहे .

वास्तव :
अस्पर्शयांमधील जे कोणी अधिकारांच्या पदापर्यंत पोहोचले असतील, कोणी राजकीय जीवनात खूप मोठ्या पदापर्यंत पोहोचले असेल, कोणी फार मोठा उद्योगपती झालेला असेल, या सर्व बाबींमुळे त्यांना ज्ञान,सत्ता, प्रतिष्ठा आणि संपत्ती मिळाली असेल तो फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच मिळालेली आहे. विचार करा, तुमची आई - वडील, आजी - आजोबा किंवा इतर पूर्वज वकील, डॉक्टर, आमदार, मंत्री का नाही झाले? त्यांनी राजमहल का नाही बांधले? मोठ्या प्रमाणात संपत्ती का जमा करू शकले नाहीत? का ते मेहनत घेत नव्हते? त्यांना मोठ्या पदावर जाण्याची इच्छा नव्हती काय? किंवा त्यांना चांगले जीवन नक्की होते का?

भ्रम :
 बौद्धांचा बौद्ध विहार तर मातंग जातीचा समाज मंदिर. त्यासाठी गावागावात मातंगाची समाज मंदिरे बांधली आहेत व बधण्यासाठी सरकारदरबारी अर्ज निवेदने देणे चालू आहे.

वास्तव :
    मातंग लोकांच्या मागणीप्रमाणे समाजकल्याण इतर योजना अंतर्गत गावागावात समाज मंदिर बांधकाम करण्यात आली आहेत.90% गावातील समाजमंदिरात जनावरे बांधतात.काही ठिकाणी त्यात पत्ते खेळतात , तर काही समाज मंदिरात लघुशंका करण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. मात्र बौद्ध विहारात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा तथागत बुद्धांचा पुतळा किंवा फोटो लावून  दिसतो त्यात बुद्ध वंदना होते. बाबासाहेबांचे गीते गायली जातात. काही वैचारिक प्रवचनेही केली जातात.

भ्रम :
  मातंग जातीला असं वाटते की, भौतिक सुधारणा झाली की सर्व काही प्रश्न सुटतात. धर्मामुळे काय अडणार आहे? धर्म कशासाठी हवा? धर्मामुळे काय फरक पडतो? धर्म म्हणजे रिकामी नको ते उद्योग आहे.
 
वास्तव :
धर्मामुळे मानवी जीवनाला एक शिस्त लागते.  सार्वजनिक बांधिलकी निर्माण होते. बांधिलकीमधून  संघशक्ती निर्माण होते. सांघिक पातळीवर कोणतेही मोठे कार्य करता येते. सांघिक भावनेने नेहमी - नेहमी प्रसंगानुरूप एकत्र आल्यामुळे त्यांच्यात वैचारिक चर्चा होते. त्यातून सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक प्रबोधन होते. त्यामुळे समाजाची वैचारिक पातळी उंचावते. नैतिक पातळी उंचावते. समाजात लबाडी,थोतांड, करणी,जादूटोणा असली फसवेगिरी बंद होते. त्यामुळे प्रत्येक माणूस इतर माणसाच्या विकासासाठी पूरक जीवन जगतो. त्या समाजात त्याग ,बलिदान, समर्पण,सेवा, सन्मान, शिस्त ,आदर निर्माण होते. त्या समाजात मोठी माणसे तयार होतात. त्यामुळे त्या समाजाकडून महान कार्य घडून येते.

भ्रम :
    *मातंग जातीचे लोक स्वतःला हिंदू समाजात. हिंदू धर्माच्या रूढी परंपरा चालीरीती चे पालन करतात. त्यामुळे त्यांना असे वाटते की आम्हाला हिंदू लोक फारच जवळचे समजतात. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका इत्यादी ठिकाणी आम्हाला विविध राजकीय पार्टीचे लोक तिकीट देतात व निवडून आणतात. शाळा, कारखाने, बँका इत्यादी ठिकाणी  सहानुभूतीपूर्वक आमचा विचार केला जातो आम्ही गुलाल वापरत असल्या बद्दल आम्हाला जवळ करतात.*
 
वास्तव :
मातंग जातीतील व्यक्ती उपद्रव करू शकत नाही. न्याय आणि अधिकार निर्भीडपणे मागू शकत नाही. थोडे गोड बोलले कि, ते उपकार म्हणून त्या ओझ्याखाली जीवन जगतो. त्याला फक्त येथे दिसते. सामाजिक हित व स्वाभिमान विसरून सवर्णाच्या हितासाठी झटतो. सवर्ण लोक मातंग जाती सोबत जे व्यवहार करतात तो  सहानुभूतीपूर्वक व्यवहार असतो. आणि बुद्धांसोबत जो व्यवहार केला जातो, तो सन्मानपूर्वक असतो. सन्मान त्याला दिला जातो जो बरोबरीचा आहे. बरोबरीचा मानणे आणि तसा व्यवहार करणे यामध्येच बौद्धांचा विजय आहे किंवा बौद्ध ही शक्तिमान आहेत,  हे सिद्ध होते. वाटणे, भाषणे आणि प्रत्यक्षात असणे या वेगळ्या बाबी आहेत. आज बौद्धांना भारतातील कोणती संस्था टाळू शकत नाही. त्यामुळेच बौद्धांसोबत सर्वत्र सन्मानाचा व्यवहार केला जातो. ते निळ वापरतात म्हणून किंवा त्यांनी हिंदुत्वाचा त्याग केला म्हणून किंवा त्यांची स्वतंत्र राजकीय पार्टी आहे म्हणून त्यांना टाळले जात नाही. तर उलट त्यांच्या सोबत सन्मानपूर्वक व्यवहार केला जातो. जो समाज स्वतच्या अस्मितेवर ठाम उभा आहे, स्वतःची झोपडी जरी  उभी केलेली असली तरी ती त्यातच मालक असल्याचा स्वाभिमान व भावना पैदा करतो करते, जो समाज अस्तित्वासाठी धडपड करतो, तो आज कदाचित मालक नसेल; पण उद्या मालक होण्याचे त्यांचे संकेत असतात. हेच बौद्धांच्या बाबतीत सिध्द होते. म्हणून त्यांच्याप्रति बरोबरीचा व्यवहार केला जातो.
(संदर्भ:- विद्रोह सत्याशी खंड1)