आधारभूत हरभरा खरेदी केंद्राला मुदतवाढ
आ.कराड यांची मागणी शासनाने मान्य केली
       
लातूर / प्रतिनिधी : शासनाच्‍या वतीने सुरू करण्‍यात आलेले आधारभूत हारभरा खरेदी केंद्राला येत्या 25 जून पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे  हरभरा खरेदी केंद्र बंद करण्याच्या सूचना संबंधिताकडून देण्यात आल्याने भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ रमेशअप्पा कराड यांनी शेतकर्‍याच्‍या हिताचा विचार करून हरभरा खरेदी केंद्रांना मुदतवाढ देण्‍याची मागणी केली होती या मागणीचा गांभीर्याने विचार करून शासनाने मुदतवाढ दिली आहे
            लातूर जिल्‍ह्यात शासनाच्‍या वतीने गेल्‍या २५ फेब्रूवारी २०२१ रोजी  आधारभूत हरभरा खरेदी केंद्र सुरू केली होती.  ९० दिवस पुर्ण होत असल्‍याने हरभरा खरेदी केन्द्र बंद करण्‍याबाबतच्‍या सुचना नाफेड मार्फत सर्व संबंधित हरभरा खरेदी केंद्र चालकांना देण्‍यात आल्‍या होत्या. कोरोना आजाराच्‍या प्रादुर्भावामुळे गेल्‍या कांही दिवसापासून जिल्‍हाभरात प्रशासनाच्‍या वतीने लॉकडाऊन लागू करण्‍यात आले आहे. यामुळे अडचणीत सापडलेल्‍या शेतकर्‍यांना वाहतूकीची झालेली गैरसोय आणि कारोनाचा वाढता प्रादुर्भाव यामुळे बहुसंख्‍य शेतकर्‍यांना खरेदी केंद्रावर आपला हरभरा देता आला नाही. आजही शेतकर्‍यांकडे मोठया प्रमाणात हरभरा शिल्‍लक असून शासनाने सुरू केलेले आधारभूत खरेदी केंद्र बंद झाले तर शेतकर्‍यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्‍या हिताचा विचार करून भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष आ. रमेशअप्‍पा कराड यांनी राज्‍याचे मुख्‍यमंत्री उध्‍दव ठाकरे, सहकार व पनण मंत्री शामराव उर्फ बाळासाहेब पाटील आणि जिल्‍हाधिकारी लातूर  यांच्‍याकडे आधारभूत हरभरा खरेदी केंद्रांना हरभरा खरेदीसाठी मुदत वाढ देण्‍यात यावी अशी मागणी केली होती शासनाने ही मागणी गांभीर्याने विचारात घेऊन येत्या 25 जून पर्यंत हरभरा खरेदी केंद्राला मुदत वाढ देण्यात आली आहे