कास्ट्राईबच्या सी.एन.कांबळे यांची चेअरमन पदी तर नंदकुमार काळे यांची व्हाईस चेअरमन पदी निवड
देवणी / प्रतिनिधी : उदगीर देवणी जळकोट जिल्हा परिषद शिक्षक पतसंस्था मर्यादित जिल्हा लातूर या पतसंस्थेच्या निवडणुकीचा समान अजेंडा- कार्यक्रम ठरवल्याप्रमाणे अल्पसंख्यांकांना नेतृत्व, महिलांना प्राधान्य आणि गेल्या 42 वर्षांमध्ये या पतसंस्थेत अनुसूचित जातीच्या व्यक्तीला चेअरमनपदाची संधी दिली गेली नव्हती ती या टर्ममध्ये संधी देणे आवश्यक आहे. या ठरलेल्या अजेंड्या नुसार कास्ट्राईब ने उपरोक्त मागण्याचे अभिवचन घेऊन पाठिंबा दिला होता. त्या अनुषंगाने आज झालेल्या निवडीमध्ये सर्व संचालक मंडळांनी बहुमताने सी. एन. कांबळे यांची चेअरमनपदी नेमणूक करुन अर्थात प्रतिनिधित्व देऊन काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या वतीने मी सर्व संचालक मंडळ विशेष करुन पँनल प्रमुख तथा सचिव सर्जेराव भांगे, माजी चेअरमन सौ शांताताई लोहारे मॅडम, उपाध्यक्ष अरविंद धनुरे सर, संचालक शिवाजीराव बिरादार सर व सर्व संचालकांची टीम यांचं कास्ट्राईब च्या वतीने मी हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो व निवड झालेल्या चेअरमन चंद्रकांत कांबळे सर , व्हाइस चेअरमन नंदकुमार काळे सर व सचिव सर्जेराव भांगे सर यांना पुढील कार्यासाठी .. तसेच पतसंस्थेची वाटचाल सभासदांच्या आर्थिक उन्नतीच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे आसे चंद्रकांत मोठेरावे यांनी सांगितले आहे
0 Comments