कोरोना सर्वेचे काम करणाऱ्या आशा स्वयंसेविकांच्या मानधनात किमान ३ हजार रु. वाढ करून, कोरोना कालावधीतील कार्याचा दरमहा २ हजार रुपये प्रोत्साहनपर भत्ता देण्यात यावा.
- लोकाधिकार संघाचा मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे मागणी करून पाठपुरावा.
लातुर / प्रतिनिधीी : गाव पातळीवर कोरोना चा सर्वे करणाऱ्या आशा स्वयंसेविका या जनतेमध्ये जाऊन आरोग्याची काळजी घेण्याचे संदर्भात जनजागरण करत असुन कोरोना विषयाच्या संबंधाने जे ही कामे असतील त्या सर्व कामात आशा स्वयंसेविका पूर्णपणे सहभागी होऊन कार्यरत आहेत. आपल्या जीवाची परवा न करता त्या जोखीम पत्करून काम करत आहेत. तेंव्हा महाराष्ट्रातील सर्व आशा स्वयंसेविका यांच्या मासिक मानधनात किमान तीन हजार रुपयाची वाढ करण्यात यावी. तसेच या कोरोना कालावधी मधील कार्याबद्दल त्यांना दरमहा प्रोत्साहन भत्ता म्हणून दोन हजार रुपये देण्यात यावेत. अशी मागणी लोकाधिकार संघाचे लोकाधिकारप्रमुख व्यंकटराव पनाळे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे केली आहे. तसेच या महामारीच्या कालावधीमध्ये ग्रामस्तरावर आरोग्य विषयक काम करणाऱ्या आशा स्वयंसेविका सह अन्य सर्व कर्मचाऱ्यांना विमा कवच देऊन प्रोत्साहित करावे अशी ही मागणी लोकाधिकार संघाच्या वतीने मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे करण्यात आली असून त्या मागण्यांचा पाठपुरावा ही चालू आहे.
वरील मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून या मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणी लोकाधिकारप्रमुख व्यंकटराव पनाळे, प्रदेश सरचिटणीस शंकरराव शेळके, हनुमंतराव शेळके, प्रदेश कोषाध्यक्ष डॉ. राम गजधने, प्रदेश कार्यकारणी सदस्य दयानंद चव्हाण, शिवदास बुलबुले यांनी लोकाधिकार संघ महाराष्ट्रच्या वतीने केली आहे. या निवेदनाच्या प्रती उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस विधानसभा, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, विरोधी पक्षनेते विधान परिषद प्रवीण दरेकर, अध्यक्ष जिल्हा परिषद लातूर राहुल केंद्रे, जिल्हाधिकारी लातूर पृथ्वीराज बी. पी., मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद लातूर अभिनव गोयल यांना पाठवण्यात आल्या आहेत.
0 Comments