"बार्टी" लातूर जिल्ह्याच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्ष रोपण पंधरवडा कार्यक्रमाचे 5 जून ते 20 जून दरम्यान आयोजन:- बलभीम सुरवसे
लातूर / प्रतिनिधी : दिनांक ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी, लातूर जिल्ह्याच्या वतीने वृक्षारोपण पंधरवडा कार्यक्रम अंतर्गत मौजे महापुर तालुका जिल्हा लातूर या गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र व स्मशानभूमी परिसरात वृक्षलागवड करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे सरपंच शिवाजीराव बनसोडे होते तर प्रमुख पाहुणे ग्रामसेविका एस. जी. ढोबळे मॅडम या होत्या मान्यवरांच्या हस्ते प्राथमिक आरोग्य केंद्रात वृक्षारोपण करण्यात आले. त्याचबरोबर स्मशानभूमी येथील हिंदू समशान भूमी या ठिकाणी वड वृक्षाची लागवड करण्यात आली तर बौद्ध समशान भूमी येथे पिंपळ या वृक्षाची लागवड करण्यात आली. पर्यावरण दिनानिमित्त फक्त रोपे लागवड संकल्प न ठेवता रोपांचे संवर्धन व संगोपन करून ते वाढविणे हा संकल्प या ठिकाणी बार्टी समता दूत ॲड. यास्मिन शेख व बलभीम सुरवसे यांच्यातर्फे करण्यात आला. वृक्ष संगोपनाची जबाबदारी ग्रामस्थ यांनी आपली नैतिक जबाबदारी म्हणून स्वीकारली. एवढेच नाही तर लावलेली झाडे वाढविण्याची त्यांनी शपथ हि घेतली.
आज डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी यांच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 5000 वृक्ष लागवड करण्याचा संकल्प करण्यात आला होता. त्याचाच भाग म्हणून या उपक्रमांतर्गत लातूर तालुक्यातील महापूर या गावी वृक्ष लागवड करण्यात आली. या कार्यक्रमास बार्टी चे समतादूत प्रकल्प विभागाचे जिल्हा प्रकल्प अधिकारी राजकुमार धनाशिरे तसेच गावचे सरपंच शिवाजीराव बनसोडे, ग्रामसेविका ढोबळे एस.जी.,तसेच ग्रामपंचायत कर्मचारी गोविंद गायकवाड, हनुमंत भांदर्गे, त्याचबरोबर पंडित ढमाले, अरुण बनसोडे, अथांग वेदेकर, महावीर बनसोडे, गणेश माने, पंडित गायकवाड, अंतेश्वर भांगे, अनंत ढमाले ,अशोकराव माने, शिवराज लांडगे ,विक्रम बनसोडे, व उत्तम बनसोडे आदी मान्यवर उपस्थित होते.
बार्टी समतादूत यांच्यावतीने वृक्षलागवड पंधरवडा याचे नियोजन करून दिनांक 5 जून ते 20 जून दरम्यान जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येने वृक्ष लागवड करण्यात येणार आहे.वृक्ष लागवडी नंतर वृक्षाची जोपासना व संगोपन करण्याबाबतचा आढावा समता दुताच्या वतीने वेळोवेळी घेतला जाईल अशी माहिती समता दूत बलभीम सुरवसे यांनी यावेळी बोलताना दिली.

0 Comments