शेतकऱ्यांनी 80 ते 100 मिलिमीटर इतका पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये कृषी विभागाचे आवाहन

देवणी / प्रतिनिधी : दिनांक 2 जून 2021 ते 04 जून 2021 या कालावधीमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र ,मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना,विजांच्या कडकडाटासह   पाऊस पडण्याची शक्यता आहे तर दिनांक 5 जून 2021 रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खाते ,कृषी हवामान शास्त्र विभाग ,पुणे यांनी वर्तवली आहे.    सोयाबीन, तूर ,भुईमूग व मका या पिकांच्या नियोजना करता पेरणीची पूर्वतयारीची कामे करावीत.विदर्भामध्ये भात पिकासाठी रोपवाटिका ची पूर्वतयारी चालू ठेवावी. खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन या पिकांसाठी जमिनीच्या प्रकारानुसार जमिनीची निवड पूर्व मशागतीची कामे करावीत.सोयाबीन,कापूस ,तूर,उडीद ,मूग ,मका या खरीप पीक पेरणी साठी शेतजमीन नांगरणी व वाखराच्या पाळ्या देऊन तयार करावी.
   राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी  किमान 80 ते 100 मिलिमीटर इतका पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये.  शेतकऱ्यांनी पेरणीची घाई  करू नये. अपुऱ्या ओलाव्या वर पेरणी केल्या नंतर पावसाचा खंड झाल्यास पेरणी वाया जाऊ शकते. 80-100 मिमी पाऊस झाल्यास पुरेशा खोलीवर ओलावा जातो व खंड पडल्यास पीक तग धरू शकते. त्या मुळे शेतकर्यांनी पेरणीची घाई करू नये असे अहवान महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत मार्फत करण्यात येत आहे.