दिव्यांग लसीकरण मोहीमेस प्रारंभ
उदगीर / प्रतिनिधी: (बंडे विजयकुमार ) : प्राथमिक आरोग्य केंद्र हांडरगूळी अंतर्गत विशेष दिव्यांग मोहीम प्राथमिक आरोग्य केंद्र हंडरगुळी अंतर्गत विशेष दिव्यांग लसीकरण मोहीम घेण्यात आली त्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र हंडरगुळी येथे एक टीम आणि दुसरी मोबाईल टीमद्वारे दिव्यांग नागरिकाचे लसीकरण करण्यात आले. दिनांक 1 जून 2021 रोजी 25 आणि 02 जून 2021 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर 05 *मोबाईल टीम द्वारे 22 असे एकूण 27 दिव्यांग नागरिकांना प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर निलेश कंदे सरांच्या मार्गदर्शनाखाली विशेष लसीकरण मोहिम घेण्यात आली.
मोबाईल टीम
1. मोरतळवाडी सकाळी 10.30 ते 12.30 ठिकाण ग्रामपंचायत
2. चिमाचीवाडी वेळ सकाळी 12.30 ते 01.30 ठिकाण देवीचे मंदिर
3. सुकनी वेळ दुपारी 01.30 ते 2.30 ठिकाण- ग्रामपंचायत
4. वाढवणा खुर्द 3.00 ते 4.30
ठिकाण- उपकेंद्रया गावा मध्ये मोबाईल टीम ने लसीकरण करण्यात आले तालुक्यातील ही प्रथम टीम आहे याणी गावोगावी जाऊन लसीकरण केले हे लसीकरण समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद लातूर व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र लातूर यांच्या संयुक्त विधमाने करण्यात आले आहे.
0 Comments