मा.ना.डॉ.रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशानुसार आंदोलनाला सुरूवात
लातूर / प्रतिनिधी : जिल्ह्यातील निलंगा येथून आज दिनाक-1 जून 2021 पासून ते 7जून 2021 या आंदोलन सप्ताहाची सुरूवात करण्यात आली.पदोन्नती मध्ये मागासवर्गीयांच आरक्षण रद्द करणारा महाराष्ट्र सरकारने काढलेला अन्याय कारक जी.आर. तात्काळ रद्द करून हे आरक्षण माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पूर्ववत कायम ठेवण्यात यावे,
या करीता आज निलंगा येथून रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आंदोलनाला सुरूवात करण्यात आली यावेळी लातूर जिल्हा अध्यक्ष मा.देवीदासीजी कांबळे साहेब,लातूर जिल्हा उपाध्यक्ष मा.अंकुश भाऊ ढेरे,आय.टी.सेल लातूर जिल्हा उपाध्यक्ष मा.गणेशभाऊ कांबळे दवणहिप्परगेकर,निलंगा तालुका अध्यक्ष मा.संदीप कांबळे,देवणी तालुका अध्यक्ष मा.विलासजी वाघमारे,विनोद सुर्यवंशी, अर्जुन कांबळे,अमित ढेरे,चंद्रकांत भोसले,निलेश गायकवाड,श्रीहरी कांबळे(चेले),आदी नेते,कार्यकर्ते उपस्थित होते,दिनांक 7जून प्रर्यंत प्रत्येक तालुक्यात रिपाइं च्या वतीने असेच आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहीती जिल्हा अध्यक्ष मा.देवीदासजी कांबळे व जिल्हा उपाध्यक्ष मा.अंकुश भाऊ ढेरे यांनी दिली.*
0 Comments