वलांडीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी
देवणी / प्रतिनिधी:- देवणी तालुक्यातील वलांडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त वंचित बहुजन आघाडी देवणी तालुका अध्यक्ष विवेकभैया टिळे व शिव-बसव फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने गोरगरीब होतकरू वंचित लोकांना राशनकिट मास्क व सेनिटाईजर वाटत करण्यात आले.
यावेळी उपस्थित शिव बसव फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष अरून पाटील, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सुशांतभैय्या साबणे, वैभव म्हेत्रै, भावेश लासुणे,दत्ता सोनकांबळे, उध्दव तावडे सर, विजय हीप्पनाळे कृष्णा भंडारे, पत्रकार आक्रम शेख व आदी सर्वपक्षीय कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते
0 Comments