कलंबर येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण

मुखेड / प्रतिनिधी : तालुक्यातील कलंबर येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण (ता.३०) सकाळी ९ वा झाले. हा क्षण म्हणजे गावच्या इतिहासातील सुवर्णक्षण आहे.अतिशय आनंदात हा सोहळा पार पडला.
     या सोहळ्याचे उद्घाटक म्हणून मुखेड पं.स.सदस्य पंढरीमामा कांबळे,प्रमुख पाहुणे डॉ.शिवाजीराव वासरे,प्रमुख वक्ते विद्यासागर डोरनाळीकर,उत्तमकुमार इंगोले सर व गावचे सरपंच विठाबाई यादवराव बापुणे उपस्थित होते.
गावामध्ये हा डॉ.बाबासाहेबांचा भव्य-दिव्य पुतळा उभा राहण्यामध्ये,गावातील शिक्षित तरुणांच्या परिश्रमाचा सिंहाचा वाटा आहे.गावामध्ये बाबासाहेबांचा पुतळ्या उभा राहण्याचे स्वप्न पूर्ण झाले.आता बाबासाहेबांचे विचार रुजवण्याचे कार्य हीच तरुण पिढी पूर्ण करेल,असे मनोगत यावेळी व्यक्त केले.