सावरगावच्या उपसरपंच सौ.स्वाती जोळदापके यांच्या वाढदिवसानिमित्त स्तुत्य सामाजिक उपक्रम 

पत्रकारांना चार लाखाचा विमा प्रदान व व्रक्षारोपण कार्यक्रमाने वाढदिवस साजरा

देवणी / प्रतिनिधी : तालुक्यातील। सावरगाव (दे) येथील उपसरपंच सौ.स्वाती जोळदापके यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम राबवले. यामध्ये कोरोनाच्या काळात आपल्या जिवाची पर्वा न करता जनसामान्यांना सकारात्मक बातम्या देऊन जनजागरण करणारा व सर्वांना प्रसिद्धी देत स्वतः मात्र दूर्लक्षीत आसणारा घटक म्हणजे पत्रकार होय.उपसरपंच सौ जोळदापके यांनी आपला वाढदिवस पत्रकार बांधवांना चार लाख रूपयांचा अपघाती विमा स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखा देवणीत उतरवून एक महत्त्वाचा सामाजिक संदेश दिला. या बरोबरच वाढदिवसाच्या निमित्ताने आरोग्य केंद्रात व्रक्षारोपण करण्यात आले.विविध सामाजिक उपक्रम राबवित अनावश्यक खर्च टाळून समाज उपयोगी उपक्रम राबवून एक आगळा वेगळा अदर्श निर्माण केला आहे.
      या वेळी बि मिडीया माध्यम समुहाचे संचालक तथा संपादक बालाजी टाळीकोटे यांनी सौ स्वाती पंढरी जोळदापके यांना "क्रषीतज्ञ : डॉ बी आर आंबेडकर" हे पुस्तक भेट देऊन आपल्या आयुष्यात सामाजिक व राजकीय क्षेत्रात आपल्या भागाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी जिल्हा परिषदे पर्यंत मजल मारावी व आपल्या हातून सत्कार्य आसेच घडत रहावे म्हणून वाढदिवसाच्या निमित्ताने मनपूर्वक शुभेच्छा दिल्या. व इतरही मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.
         या वेळी प्रमुख उपस्थिती म्हणून बळीराजा प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा.मधूकर भाऊ सावरे,ग्रामपंचायत सदस्य काशीनाथ मुंगे, पत्रकार क्रिष्णा पिंजरे, आशा कार्यकर्ती सौ.उषा स्वामी,लक्ष्मीबाई बिरादार,अंगणवाडी सेविका शेषीकला बिरादार,वर्षा गिरी,महिला सखी सारीका सावरगावकर,आरोग्य सेविका एच.आर.बिरादार,सामुदायिक आरोग्य अधिकारी फराह शेख,उद्देश्वर शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष पांडुरंग बिरादार, माजी सरपंच व्यंकट बिरादार, माजी उपसरपं धनाजी कापडे,प्रा.आनंद देशपांडे, माजी ग्रा.प.सदस्य वैजनाथ बिरादार, श्रीपत भिंगे,दत्ता कापडे,गोपीनाथ बिरादार, राजू मसूरे,राजकुमार गिरी,माधव कोळी,योगेश बिरादार, विनोद बिरादार, सोनाजी गंगाजी,विश्वजीत बिरादार, दयानंद कांबळे, भारत बिरादार आदींची उपस्थिती होती.
     सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पत्रकार लक्ष्मण रणदिवे यांनी केले तर सामाजिक कार्यकर्ते तथा शिवसेनेचे तालुका संघटक पंढरी जोळदापके यांनी आभार मानले.