उमेद न दिली महिलांना जिवन जगण्याची नवी उमेद...
जवळगा / प्रतिनिधी (संतोष पाटील) : देवणी तालुक्यातील महिला सक्षमीकरणा अंतर्गत गावोगावी स्थापन केलेल्या ग्रामसंघामार्फत शासनाने दिलेल्या आदेशानुसार मा. मुख्य कार्यकारी कार्यधिकारी यांनी काढलेल्या आदेशानुसार गावातील शासकीय बांधकामे व घरकुल साठी लागणारे सर्व प्रकारचे बांधकाम साहित्य व ग्रामपंचायत तर्फे ग्रामविकासासाठी गावात रस्ता नाली या कामना लागणारे साहित्य उमेद घरकुल मार्ट मधून खरेदी केल्याशिवाय त्या कामाचे बिल देण्यात येणार नसल्याची माहिती महिला सक्षमीकरण केंद्राचे समन्वयक श्री मलवाड यांनी बचत गटातील सदस्यांना समजून देऊन देवणी तालुक्यातील मौजे जवळगाव येथे उमेद घरकुल मार्टचे उदघाटन करण्यात आले.
या उद्घाटन सोहळा प्रसंगी राणी लक्ष्मी महिला ग्रामसंघाच्या वतिने उमेद घरकुल मार्ट बांधकाम साहित्य विक्री महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियान अंतर्गत उदघाटन करण्यात आले, यावेळी उदघाटन जि. प.सदस्य मा. प्रशांत पाटील जवळगेकर , मा. सभापती पं. स. देवणी ,बोरोळ गणातील पं. स. सदस्य सोमनाथ बोरोळे ,जवळगा ग्राम पं. सरपंच हणमंत बिरादार ,सुरज मुळे , तलाठी बनसोडे, ता. अ. व्यवस्थापक विडप ,प्र. समन्वयक मलवाड , बोनाकृती मॅडम , ग्रामसंघ पदाधिकारी ,CRP ,लिपिका व सोमनाथ बोडके उपस्थित होते.

0 Comments