वडमुरंबी ग्रा. प. कार्यालय प्रांगणामध्ये शिवराजभिषेक दिन ध्वजारोहण

देवणी / प्रतिनिधी : तालुक्यातील वडमुरंबी ग्रामपंचायत कार्यालय प्रागंणामध्ये ६ जून रविवार रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्यभिषेक दिनानिमित वडमुरंबी येथील जेष्ट नागरिक बालाजी हाणमंतराव मोरे यांच्या हस्त्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन करून स्वराज्य ध्वजवंदन करण्यात आले. आणि शिवराजभिषेक दिनानिमित्य पर्यावरण संवर्धनासाठी वडमुरंबी चे सरपंच जानोबा भिंगे वटवृक्ष रोपन लागवड केली.
शिवराज्यभिषेक दिन कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगिताने व स्वराज्य शिव शाहिर गिताने करण्यात आली.
या कार्यक्रमास प्रशासकिय कर्मचारी ( ग्रामसेवक राजकुमार म्हेत्रे.) ग्रा. पं. चे सर्व सदस्य आणि मोरे देविदास , चेहरमन यलप्या डि. बिजापूरे , ग्रा. पं. सदस्य विनोद शिंदे , व माधराव मोरे, माधवराव मुर्गे ,  संजीव सुर्यवंशी,धनराज हरनाळे, आदी ग्रामस्थाची मोठ्या संख्येने  उपस्थिती होती.
 ग्रा. पं. च्या वतीने सरपंच ज्ञानोबा भिंगे यानी  सर्व ग्रामस्थाचे आभार मानले.