जागतिक पर्यावरण दिनानिमित्त हंडरगुळी ता.उदगीर येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

उदगीर / प्रतिनिधी : (विजयकुमार बंडे) जागतिक पर्यावरण दिनानिमित्त हंडरगुळी ता.उदगीर येथे वृक्षारोपण व विविध विकास कामांचे उद्घाटन मा.राज्यमंत्री पर्यावरण व पाणीपुरवठा मंत्री संजय बनसोडे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपसरपंच बालाजी भोसले पाटील यांनी केले यावेळी हंडरगुळी गावच्या विविध विकासकामासाठी निधींची मागणी त्यांनी केली. यावर बोलताना मा.संजयजी बनसोडे साहेब यांनी ३० लक्ष रुपयांचा निधी हंडरगुळीतील विविध विकासकामांसाठी मंजुर केला.
यावेळी उदगीर पंचायत समितीचे सभापती प्रा. शिवाजीराव मुळे साहेब, युवक राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष चंदनजी पाटील साहेब, माजी सभापती कल्याण पाटील साहेब, जि.प. सदस्य ज्ञानेश्वर पाटील, विस्तार अधिकारी महेश सुळे सर,  रामराव बिरादार मामा, युवराज कांडगिरे, सरपंच विजय अंबेकर, उपसरपंच बालाजी भोसले पाटील, ग्रामविकास अधिकारी एस.आर.कांबळे, डॉ.गोविंद दापके, पंडितराव भोसले, ग्रामविकास अधिकारी शंकर भोसले, डॉ. मोहन धुप्पे, ग्रामसेवक गजानन भोसले, मगदूम शेख, पंडितराव भोसले शेख अब्बास, शेख महेबूब, तसेच ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर पिट्टलवाड,अंकुश अनलदास, सतिश कांबळे,सुनिल कांबळे,ऊमाकांत ऊडतेवार,मोहन दापके,माणिक कांबळे, युसुफ शेख, व ग्रामस्थ उपस्थित होते.