देवणी तालुका काँग्रेसच्या वतीने महागाई विरोधात आंदोलन
देवणी / प्रतिनिधी : तालुका काँग्रेस देवणीच्या वतीने केंद्र सरकारच्या विरोधात अंदोलन करण्यात आले.
दिवसेंदिवस डिझेल, पेट्रोल, स्वयंपाकाचा गैस महाग होत आसल्याने सर्व सामान्यांचे जगणे आवघड होत आसल्या बाबत सोमवारी सकाळी देवणी तालुका काँग्रेसच्या वतीने पेट्रोल पंपा समोर अंदोलन करण्यात आले.
या वेळी काँग्रेसचे जेष्ट नेते दिलीप पाटील नागराळकर,तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अजित बेळकोणे संजय गांधी योजनेचे अध्यक्ष वैजनाथ लुल्ले,निलंगा जिल्हा उपाध्यक्ष मालबा घोणसे, विधानसभा अध्यक्ष गजानन भोपणीकर,जावेद येरोळे, कृष्णा पाटील, प्रताप कोयले, नामदेव मुराळे, बालाजी वळसांगवीकर आदींची उपस्थिती होती.

0 Comments