वंलाडी येथे मा खा रुपाताई पाटील निंलगेकर यांच्या वाढदिवसानिमीत्ताने फेरीवाले,व भाजीविक्रतेयांना छञी वाटप
----------------------------------------------------
देवणी / प्रतिनिधी : तालुक्यातील वलांडी येथे आज लातूर जिल्ह्याच्या माजी खासदार आम्हा सर्व कार्यकर्त्यांच्या श्रद्धास्थान आदरणीय श्रीमती रूपाताई पाटील निलंगेकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अक्का  फाऊंडेशन यांच्या वतीने वंलाडी  शहरात  रस्तावरती बसणारे, ...स्वता:चा उदरनिर्वाह भागवण्यासाठी स्वता:च्या कुटुंब चालवण्यासाठी रस्त्याच्या बाजूला बसणारे ,चर्मकार व्यवसाय करणारे बांधव फळ विक्री करणारे, भाजीपाला विक्री करणारे, , पान तंबाखू विक्री करणारे व्यवसायिक इत्यादी व्यवसायिकांना ऊन आणि पावसापासून संरक्षण होण्यासाठी अम्ब्रेला छत्री वाटप करण्यात आले.
      यावेळी  भाजपा  तालुका अध्यक्ष श्री काशिनाथ गरिबे ,जि.प सदस्य श्री प्रंशात पाटील ,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री  तुकाराम पाटील, सभापती श्री बालाजी बिरादार,श्री सुधिर भोसले अक्का फांऊडेशन समन्वयक श्री रामलिंग शेरे ,श्री प्रंशात पाटील, भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष श्री  बालाजी बिरादार , श्री संगम पताळे ,भाजयुमो तालुका उपाध्यक्ष श्री दिपक कल्लुरे ,आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.*