लोकमाता, राष्ट्रमाता, महाराणी आहिल्यामाई होळकर यांची जयंती ऊत्साहात साजरी......
परभणी / प्रतिनिधी : मौजे गौंडगाव येथे महाराणी आहिल्यामाई होळकर यांची २९६ वी जयंती शासनाने घालुन दिलेल्या नियमाप्रमाणे राजे मल्हारराव होळकर मित्रमंडळाच्या वतीने मोठ्या ऊत्साहात साजरी करन्यात आली.राजमाता, मॉंसाहेब आहिल्यामाई होळकर यांचा वैचारिक वारसा जपन्याचा संकल्प करत पहिल्यादांच गौंडगाव येथील सर्व बहुजन बांधवानी एकत्रित येऊन राजे मल्हारराव होळकर यांच्या शाखेचे ऊदघाटन करत जयंती ऊत्सव साजरा करण्यात आला त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन रिपाई चे मराठवाडा अध्यक्ष मा.ऊत्तमराव वाव्हुळे तर प्रमुख पाहुणे राजे मल्हार मि.मं.ता.अ.मा.नारायन घनवटे तर प्रमुख वक्ते म्हणुन महाराष्ट्राची मुलूख मैदानी तौफ, सुप्रसिध्द व्याख्याते, मा.प्रा.एम.एम.सुरनर सर ऊपस्थित होते त्यांनी आहिल्यामाईचा खरा ईतिहास समजावुन सांगत असताना आहिल्याराणीच्या हातातील पिंड व्यवस्थेने त्यांच्या शौर्याचा, पराक्रमाचा ईतिहास लपवण्यासाठी तलवार काढून ठेवण्याचा जो पायंडा घातला आहे तो आपण सर्व बहुजनांनी एकत्र येऊन आहिल्यामाईचा लढा ईथल्या वाईट पंरपरा, सतीप्रथा,गरीब, श्रीमंत, हुंडाबंदी, पर्यावरण रक्षण न्याय, अन्याय महिला सक्षमीकरण तसेच देशातील भटकंती करणारा जो समाज आहे त्याना उन, वारा, पाऊस यापासुन रक्षण करण्यासाठी अनेक पानवठे, घाट, मंदिरे, त्याबरोबरच रायगड, तुळापुर, ईत्यादि अनेक एतिहासिक वास्तुचा जीर्णोध्दार करत देशातील ऊत्तम प्रशासक, प्रजाहितदक्ष राज्यकारभार व समता प्रस्थापित करणारे लोकराज्य, लोकप्रशासन आहिल्यामाईचे होते असा सत्यशोधक विचार प्रबोधनाच्या माध्यमातुन मांडत सर्व बहुजन समाजातील बांधवानी समाजात समतेने राहिले पाहिजे व महापुरूषांचा विचार आत्मसात करत आपले जीवन सुखी, समृध्द व संपन्न बनवले पाहिजे हा प्रा.सुरनर सरांनी बोलत असताना संदेश दिला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मल्हारी कुकडे यांनी तर आभार शाखाध्यक्ष वैभव कुकडे यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी मौजे गौंडगाव येथील सर्व कुकडे व बहुजन बांधवानी परिश्रम घेतले...
0 Comments