लिंगायत महासंघाच्या जिल्हा कार्यकारिणीची औसा येथे  येत्या रविवारी व्यापक बैठक

लातूर / प्रतिनिधी : लिंगायत महासंघ लातूर जिल्ह्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांची एक व्यापक बैठक लिंगायत महासंघाचे प्रांत अध्यक्ष प्रा सुदर्शनराव बिरादार यांच्या अध्यक्षतेखाली  रविवार दिनांक 6 जून 2021 रोजी दुपारी एक वाजता मुक्तेश्वर मंगल कार्यालय औसा येथे आयोजित करण्यात आली आहे असे लिंगायत महासंघाचे जिल्हा सरचिटणीस चंद्रकांत कालापाटील यांनी सांगितले याबाबत अधिक असे की लिंगायत महासंघाच्या जिल्हा कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी व लातूर जिल्ह्यातील सर्व तालुक्याचे प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत संघटनेच्या पुढील वाटचालीस संदर्भात ही बैठक आयोजित करण्यात आली आहे तसेच औसा तालुका अध्यक्ष व कार्यकारिणीची निवडही या दिवशी लिंगायत महासंघाचे प्रांताध्यक्ष प्रा  सुदर्शनराव बिरादार हे करणार आहेत तरी या बैठकीसाठी लिंगायत महासंघाच्या जिल्हा कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी तसेच लातूर सर्व संघटक , जिल्ह्यातील सर्व तालुक्याचे संघटक ,शहराध्यक्ष ,तालुकाध्यक्ष  व प्रमुख पदाधिकारी यांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन चंद्रकांत कालापाटील यांनी केले आहे.हा कार्यक्रम  यशस्वी करण्यासाठीं लिंगायत महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्राचार्य डॉ काशिनाथ राजे, जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी भातमोडे,,औसा तालुका युवक अध्यक्ष गणेश बिराजदार ,संयोजक बसवराज कोपरे ,धनराजदादा कोपरे,किशन कोलते ,यांच्यासह अनेक कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत ..यावेळी औसा तालुक्यातील अनेक गावात शाखा स्थापन होणार असून अनेक कार्यकर्ते संघटनेत प्रवेश करणार असल्याचे जिल्हासरचिटणीस चंद्रकांत कालापाटील यांनी सांगितले.