होलार समाजाचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी लवकरच शरदचंद्रजी पवार व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या सोबत चर्चा करून लवकरच होलार समाजाला न्याय देणार - रुपालीताई चाकणकर
सांगली / प्रतिनिधी : होलार समाजातर्फे होलार समाज समन्वय समितीचे संस्थापक अध्यक्ष राजाराम ऐवळे यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र राज्याच्या महिला प्रदेश अध्यक्षा सौ.रुपालीताई चाकणकर यांची सदिच्छा भेट दिली यावेळी त्याचा सत्कारा प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी होलार समाजाचा विविध प्रश्नांवर करण्यात आली. यावेळी रुपाली चाकणकर म्हणाल्या लवकरच शरद पवार व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या सोबत चर्चा करून लवकरच होलार समाजाला न्याय देणार,,, अशी ग्वाही रुपालीताई चाकणकर यांनी दिली,, होलार समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्षा सौ.रुपालीताई चाकणकर यांना निवेदन देण्यात आले,,, निवेदनात म्हटले आहे कि होलार समाज भुषण वि. दा. ऐवळे यांचे स्मारक सांगलीत उभारण्यात यावे,,, त्या स्मारकासाठी १००.कोटी निधी उपलब्ध करून द्यावे,चर्मकार महामंडळात होलार समाजाला प्रतिनिधी देण्यात यावे,होलार समाजाच्या ज्याठिकाणी चुकीच्या जाती नोंदी झाल्याल्या होलार असे दुरुस्ती करून होलार असे मिळावे होलार समाज अभ्यास आयोग नेमण्यात यावा व अनेक मागण्याचे निवेदन देण्यात आले,,,
यावेळी,,,होलार समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्य युवा अध्यक्ष दत्ताभाऊ गेजगे.सागली जिल्हाध्यक्ष आनंदराव ऐवळे शहर जिल्हाध्यक्ष दिपक हेगडे महादेव कांबळे दगडु ऐवळे सिद्धेश्वर करडे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते,. फोटो ओळ रुपाली चाकणकर यांचा सत्कार राजाराम ऐवळे यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी दत्ताभा गेजगे.दिपक हेंगडे महादेव कांबळे आदी उपस्थित होते.

0 Comments