गौडगाव येथे घरकुल मार्टचा शुभारंभ 

देवणी / प्रतिनिधी : महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाच्या वतीने ८ ते ५ जून दरम्यान राबविण्यात येणाऱ्या महासमुध्दी महिला सक्षमीकरण अभियान उमेद महाराष्ट्रराज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान अंतर्गत गौडगाव येथे घरकुल मार्ट चा शुभारंभ करण्यात आले .
देवणी तालुक्यातील मौजे गौंडगाव, ता देवणी, जि लातूर, येथे *गौरी गणपती महिला स्वयं सहायता समूह चे अनिता बब्रुवान बिरादार* यांचे उमेद घरकुल मार्ट(बांधकाम साहित्य विक्री) महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियानांतर्गत मा. सरपंच श्री जयश्री शिवाजी बिरादार ताई यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. यावेळी उपस्थित सरपंच मा. जयश्री शिवाजी बिरादार ताई, ग्रा. प. गौंडगाव, उपसरपंच मा. परमेश्वर बोरोळे, ग्रामसेवक माने सर, ग्रामपंचायत सदस्य शशिकला करण बिरादार, ता.अ.व्यवस्थापक राजेंद्रप्रसाद विडप सर, प्र.समन्वयक सुखदेव मलवाड सर, सिद्धार्थ बेद्रे सर, लता बोनाकृती मॅडम, सक्षम महिला ग्रामसंघाचे सचिव सविता पंढरी बिरादार, कोषाध्यक्ष सारिखा संतोष पाटील, CRP मंजुळा शिवपुरे ई.उपस्थित होते.