मागील भांडणाच्या कुरापतीवरुन जिवे मारल्याची पालकांची मुख्यमंञ्याकडे चौकशीची मागणी !
देवणी / प्रतिनिधी : देवणी शहरातील इसाम दाउत येरोळे वय 26 वर्षे राहणार देवणी या युवकाचे इतर पाच जणांनी मिळुन मागील भांडणाची कुरापत काढुण नगरपंचायतीच्या शेतात जिवे मारल्याची घटना घडली या गंभीर घटनेतील चौकशी ची मागणी युवकाच्या पालकांनी मुख्यमंञ्याकडे निवेदना दवारे मागणी केली आहे
याबाबत ची अधिक माहिती अशि कि दि 29/ मे 2021 रोजी वार शनिवार दुपारी दोन ते तिनच्या दरम्यान नगरपंचायतीच्या हद्दीत असलेल्या शेतात मागील भांडणाच्या वादावरुन आनंद वामन सुर्यंवशी हा युवक सदर मयत युवकाच्या घटने दिवशी सकाळी घरी येवुन शेताकडे जाण्याच्या निम्मीत्ताने बोलावुन घेतला शेतात गेल्यानंतर आनंद वामन सुर्यवंशी, शिरापुरे महादेव वैजनाथ,यांच्या सह इतर तिघेजन अगोदरच त्या ठिकाणी दबा धरुन बसले असल्याचे मयताच्या पालकाने निवेदनात म्हणले आहे
पैशाच्या देण्या घेण्यावरुन तोंडी बाचा बाचीचे रुपांतर गंभीर मारहाणीत झाली,या मारहाणीत इसाम दाउत येरोळे या मुलाचा मृत्यू झाला,वैद्यकीय तपासणी केल्यानंतर वैद्यकीय अधिकारी डाॕ गीरी यांनी मयत झाल्याचे सांगितले या प्रकरणी देवणी पोलीसात अकस्मीत मृत्युची नोंद झाली आहे
मात्र पालकांनी वरील युवकावर गुन्हा नोंद करुण या घटनेची स्वीस्तर चौकशी करण्याची मागणी मुख्यमंञी व गृहमंञी,अल्पसंख्याक आयोग,पोलीस महासंचालक,विशेष पोलीस महानिरीक्षक,लातुरचे पालकमंञी,राज्यमंञी,जिल्हा पोलीस अधिक्षक,जिल्हाधिकारी यांच्या कडे निवेदनादवारे केली आहे

0 Comments