संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियानाचा स्तूत्य उपक्रम

विकेल ते पिकेल" योजने अंतर्गत धनेगाव येथे सेंद्रिय गूळ विक्रीस सुरुवात

देवणी / प्रतिनिधी : तालुक्यातील धनेगाव येथे "विकेल ते पिकेल" योजने अंतर्गत सेंद्रीय गूळ विक्रीचा शुभारंभ गुरुवारी (तिन) निलंगा-उदगीर रोडवरील चौकात करण्यात आला.
      कृषी विभागाच्या संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियान योजनेच्या उपक्रमा अंतर्गत शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालावर अधिकचा फायदा मिळावा म्हणून " विकेल ते पिकेल " या योजने अंतर्गत प्रदीपकुमार दिगंबरराव पाटील यांच्या सेंद्रिय शेतामध्ये निर्मित केलेल्या गाईच्या तुपापासून आणि दुधापासून पूर्णपणे शंभर टक्के सेंद्रिय गुळ विक्रीचा शेतकरी उत्पादक ते थेट ग्राहक स्टॉलचे शुभारंभ करण्यात आल्याने ग्राहकांना दर्जेदार गुळाची चव घेता येणार आहे. 
       आत्माचे प्रकल्प उपसंचालक आर एस पाटील यांनी प्रत्येक तालुक्यातील विविध फळ पीक भाजीपाला पिक घेणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती वेळोवेळी अद्ययावत करण्याच्या सूचना दिल्यानूसार तालुक्यात मोक्याच्या ठिकाणी आणि आठवडी बाजारामध्ये शेतकरी ते थेट ग्राहक मूल्य साखळी निर्माण करता येईल आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांना अधिक नफा मिळेल या दृष्टीने संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियान योजनेचा आणि विकेल ते पिकेल या अंतर्गत विविध योजनांचा शेतकऱ्यांना लाभ घेता येणार आहे. 
       देवणी तालुक्यात एकूण ५४ गावांपैकी ३२ ठिकाणे विक्रीयोग्य निश्चित करण्यात आलेली असून त्यापैकी जवळपास १५ विविध ठिकाणी शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला स्वतःचा शेतमाल शेतकरी ते थेट ग्राहक अशाप्रकारे विकलेला आहे. आज पर्यंत अशा ठिकाणी विकलेल्या मालाचे एकूण परिमाण हे जवळपास पाच टन असून त्याचे अंदाजे किंमत जवळपास तेरा लक्ष साठ हजार रुपये आहे. अशा निश्चित केलेल्या ठिकाणाहून शेतकरी स्वतः उत्पादित केलेला शेतमाल विक्री करत आहेत ज्यामुळे अधिकचा फायदा मध्यस्तीला न मिळता तो थेट शेतकऱ्यांच्या पदरात पडणार आहे.

     "बाजारामध्ये सर्वाधिक मागणी असलेली फळपीके,भाजीपाला,आणि प्रक्रिया करून निर्मित केलेले पदार्थाचे शेतामध्ये योग्य नियोजन केल्यास उत्पादित केलेला शेतमाल शेतकरी ते थेट ग्राहक अशी मूल्य साखळी निर्माण होईल त्यामुळे शेतकऱ्यांना अधिकाधिक नफा मिळेल".

- दत्तात्रय गावसाने
प्रकल्प संचालक आत्मा तथा क्रषि अधिक्षक
लातूर


"संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार" अभियानामध्ये शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा तसेच शासनाच्या शेतकरी उत्पादक ते थेट ग्राहक या वेबसाईटवर ती जाऊन गुगल स्प्रेडशीट मध्ये नाव नोंदणी करुन सदरील योजनेचा लाभ घ्यावा.
- राहुल जाधव
बि.टि.एम.आत्मा
क्रषि विभाग देवणी
 देवणी : मौ.धनेगाव ता.देवणी येथील प्रदिपकुमार पाटील यांनी तयार केलेल्या सेंद्रिय गूळ विक्रीसाठी उभारण्यात आलेला स्टाँल.