जागतिक पर्यावरण दिनी नागराळ ग्रामपंचायतीच्या वतीने वीस हजार रोपांची लागवड
पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांची प्रमुख उपस्थिती
देवणी / प्रतिनिधी : तालुक्यातील नागराळ ग्रामपंचायतीच्या वतीने शनिवार दि.५ जून जागतिक पर्यावरणदिनी राज्याचे पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते वीस हजार रोपांची लागवड करण्यात येणार आहे.
देवणी तालुक्यातील नागराळ येथे वनविभाग, उस्मानाबाद अंतर्गत १०० एकर जमीन असून जागतिक पर्यावरणदिनानिमित्त शनिवारी येथील २० एकर क्षेत्रात २० हजार रोपांची लागवड राज्याचे पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते लागवड करण्यात येणार आहे. यामध्ये वड, पिंपळ, लिंब, बेहडा, करंजी सह इतर रोपांची लागवड करण्यात येणार आहे. याप्रसंगी लातूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी बी. पी. पृथ्वीराज, लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, उस्मानाबाद वनविभागीय अधिकारी एम. आर. गायकर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर, निलंगा उपविभागीय अधिकारी विकास माने, देवणीचे तहसीलदार सुरेश घोळवे, गटविकास अधिकारी मनोज राऊत यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या वृक्षलागवड प्रसंगी उपस्थित राहण्याचे आवाहन लातूर जिल्हा परिषदेचे माजी गटनेते दिलीप पाटील नागराळकर, नागराळचे सरपंच विष्णू एनिले, उपसरपंच रतन पाटील नागराळकर व नागराळ ग्रामस्थांनी केले आहे.

0 Comments