वंचित उपेक्षितांचा आवाज : मा.श्री.राजारामजी ऐवळेसाहेब 

 मा.राजारामजी ऐवळे साहेब हे  मूळचे आटपाडी गावचे रहिवाशी मात्र त्यांचे आजोबा राजेवाडी येथे राहावयास आले होते. वडील अंध घरी अठराविश्व दारिद्र्य त्यातून तीन मुलांचे शिक्षण हा सगळा प्रपंच त्यांचे आई-वडील काबाड कष्ट करून सांभाळत होते.
        मा.राजारामजी ऐवळे साहेब हे घरातील मोठा मुलगा असल्याने खूप जबाबदाऱ्यांची भिस्त त्यांच्या खांद्यावर होती. बुद्धीने अतिशय तल्लख असलेले हे प्राथमिक  शाळेत नेहमी पहिल्या क्रमांकावर  असायचे. वडील अंध असून देखील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा पगडा त्यांच्यावर होता. त्यामुळे ते आपल्या हुशार मुलाला म्हणजे मा.राजारामजी ऐवळे साहेब यांना "माझा बाबासाहेब आहे" असे अभिमानाने म्हणायचे.
         एके दिवशी शाळा बुडवून  लहानपणी मासे पकडायला गेले .ही गोष्ट वडिलांना कळाल्यावर त्यांनी बोलावून घेतले आणि काठीने बदडून काढले. थोड्यावेळाने समजावून सांगितलं ...! 
    "शिक्षण ही एकच गोष्ट तुझं ..., तुझ्या घराच..., आणि तुझ्या समाजाच...,परिवर्तन करू शकते ....!"
     आणि खऱ्या अर्थाने येथूनच एका संस्थापकाची एका सामाजिक नेतृत्वाची जडणघडण सुरू झाली. 
        प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर "माहुली"येथे डीएड केले
        राजेवाडी गावातील काही युवकांना एकत्र करून आदर्श मित्र मंडळ सुरू केले.    त्यामाध्यमातून आपण सामाजिक कार्य उभा करू  असा त्यांचा माणस होता पण त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. 
        1996 साली राजेवाडी गावांमध्ये
 *"ज्ञानज्योत मोफत वाचनालय"*
   ही पहिले संस्था सुरू केली आणि त्यानंतर *आटपाडी तालुक्यातील 56 गावांपैकी 40 गावांमध्ये त्यांनी ग्रंथालय   स्थापन* केले.ही गोष्ट  पुढाऱ्यांच्या  लक्षात आल्यानंतर त्यांचे पोट दुखू लागले आणि त्यांनी सर्वपक्षीय आंदोलन करून यातील बरीच ग्रंथालय हडप केली.तर काही विकण्यास भाग पाडले.
      कोणताही राजकीय वारसा नाही..,पाठीशी चार लोक नाहीत..., शिक्षकाच्या नोकरीतून येणाऱ्या तुटपुंज्या पगारात घरखर्च.....,छोट्या भावाचे शिक्षण.., आणि त्यातूनच संस्था निर्मिती ,सामाजिक कार्य हे सगळ एकाच वेळी सुरू होत.
       आटपाडीचे बंधुतुल्य होलार समाजाचे नेते मा. पांडुरंग ऐवळे  साहेब यांनी आजपर्यंत खंबीर पणे साथ दिली. समाज एकत्र करून चळवळ सुरू झाली.अखिल भारतीय होलार समाज संघटनेचे नेतृत्व मा श्री.राजारामजी ऐवळे साहेब यांच्याकडे आले. सर्व महाराष्ट्र पिंजून काढला. गावोगाव शाखा काढल्या अकलूजचे मा.नंदकुमार केंगार  साथीला होते.
       महाराष्ट्रातील सामाजिक  चळवळीतील एकही कार्यकर्ता असा नाही की जो मा.राजारामजी ऐवळे साहेबांना ओळखत नाही.
    2005 साली सांगोला येथे भरलेल्या होलार समाज परिषदेमध्ये मा.श्री. राजारामजी ऐवळे  साहेब यांना *"समाजरत्न पुरस्कार"* देऊन गौरवण्यात आले.या प्रसंगी तत्कालीन मंत्री  मा. ना. आर आर पाटील, मा. ना.विजयसिंह मोहिते पाटील,मा.ना.लक्ष्मणराव ढोबळे,साथी गणपतरावजी देशमुख असे तत्कालीन दिग्गजांच्या उपस्थितीत हा गौरव सोहळा पार पडला.
         *सन 1999 ला आदर्श शिक्षण संस्था , राजेवाडीची  स्थापना केली.* राजेवाडी येथे एक माध्यमिक विद्यालय सुरू केले.राजेवाडी आणि परिसरातील विद्यार्थ्यांची माध्यमिक शिक्षणासाठीची पायपीट थावंबली. 
      तत्कालीन पंढरपूर लोकसभा मतदार संघाचे खासदार व सध्याचे केंद्रीय समाज कल्याण मंत्री मा . रामदासजी आठवले साहेब यांनी स्वतः राजेवाडी येथे संस्थेस सदिच्छा भेट देऊन शुभेच्छा सह खासदार  फंडातून शाळेसाठी इमारत देऊ केली. आजही आठवले साहेब सांगली दौऱ्यावर येणार असल्यास अगोदर फोन वरून सांगतात 
"राजू उद्या मी सांगलीला येतोय"
असे मैत्रीपूर्ण संबंध महाराष्ट्रातील अनेक नेत्यांसोबत मा.राजारामजी ऐवळे साहेबांनी आजही जपलेले आहेत.
       सन 2005  साली आदर्श शिक्षण संस्था, राजेवाडीत  आणखी एका शाखेचीे भर पडली ती म्हणजे .. *"केंद्रीय निवासी आश्रमशाळा,राजेवाडी"* *सन 2019 ला आणखी दोन आश्रम शाळा घेऊन सिद्धेवाडी , मिरज  आणि सुभाष नगर ,  मिरज  येथे सुरू केल्या आहेत.*
      *आज आदर्श शिक्षण संस्थेच्या तीन आश्रमशाळा आणि एक माध्यमिक व एक ज्युनिअर कॉलेज असा विस्तार वाढला आहे.*
       सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळावे. त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था व्हावी म्हणून सन  2005 पासून आज आखेर आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना  स्वखर्चाने शिक्षणासह शालेय साहित्य व खाण्यापिण्याची सोय मोफत देत आहेत.
      होलार समाज समन्वय समितीच्या माध्यमातून  सामाजिक कार्याचा तर आदर्श शिक्षण संस्था , राजेवाडी च्या माध्यमातून शैक्षणिक कार्याचा हा यज्ञकुंड अखंडपणे सुरू आहे.
   दोन हजार वीस पासून सुरू झालेल्या कोरोना काळात राजेवाडी व परिसरातील लोकांना मास्क सॅनिटायझर व सी जीवनसत्व च्या गोळ्या मोफत वाटप केले.आटपाडी येथील रखडलेले समाज मंदिराचे काम सुरू केले.सांगली येथे समाज मंदिरासाठी जागा मिळवून देऊन दोन कोटी रुपयाची समाज मंदिर मंजूर करून घेतले आहे. 
     या फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांनी भारलेल्या.... सामाजिक ...शैक्षणिक... कार्यास जीवन समर्पित केलेला ..."अवलिया" म्हणजे 
  "मा. श्री.राजारामजी ऐवळे साहेब"
 यांचा आज वाढदिवस  त्यांच्या वाढदिनी अनंत शुभेच्छा ..! 
       आपणास सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात आणखी मोठ कार्य करण्याची स्फूर्ती मिळो  आपल्या हातून खूप मोठ सामाजिक व शैक्षणिक कार्य घडो  या सदिच्छांसह ......
 पुनश्च .....    
  "आपणास वाढदिवसाच्या निमित्ताने बि.टि.व्हि.न्यूज महाराष्ट्र कडून हार्दिक शुभेच्छा ....!.!