जांभूळ
उन्हाळ्याच्या शेवटी व पावसाळ्याच्या सुरूवातीस काळसर, जांभळ्या रंगाच्या जांभळाचे घड झाडाला लगडलेले दिसतात. निसर्गाने निर्माण केलेले हे फळ शरीरात अमृतासमान कार्य करते.
ग्रीष्म ऋतूत आंबा हे अमृतफळ असते तर वर्षाऋतूत जांभूळ हे अमृतफळ असते, प्राचीन काळापासून भारतात ही वनस्पती आहे व तिचा आहाराबरोबरच औषधातदेखील समावेश केलेला आहे.
पोटदुखी, अपचन, करपट ढेकर अशा विकारांवर जांभळाचे सरबत प्यावे जांभुळ हे दिपक, पाचक असल्याने अन्न निट पचवते (२) यकृताची क्षमता वाढवण्याकरता ७ ते ८ जांभळे पाण्यात भिजत घालून १५ मिनिटे उकळावी व नंतर पाण्यातच लगदा करून ते पाणी ३ ते ४ वेळा प्यावे रक्तशर्करा कमी होऊन यकृत कार्यक्षम होते.
गर्भाशयाच्या बीजकोशांना सूज आल्याने अनेक स्रियांना वंध्यत्व येते अशावेळी जांभूळाचे बी १०० ग्रॅम ,मंजिष्ठा ५० ग्रॅम , कारले बी ५० ग्रॅम, अशोका चूर्ण ५० ग्रॅम व सारीवा ५० ग्रॅम या सर्वांचे चूर्ण एकत्र करून सकाळी १ चमचा, व रात्री १ चमचा घ्यावे यामूळे
बीजांडकोषाची सूज ( पी.सी.ओ.डी.) हा आजार आटोक्यात येतो.तसेच स्रियांमध्ये होणाऱ्या श्वेतप्रदरावर जांभळाच्या सालीचा काढा हा अत्यंत ऊपयोगी आहे.
जांभळाचे बी व साल ही *मधूमेह* या आजारावर अत्यंत उपयोगी आहे, जांभूळ बी १५० - ग्रॅम , हळद ५० - ग्रॅम ,आवळा ५० -ग्रॅम , मिरे -५० ग्रॅम व कडूनिंबाची पाने -५० ग्रॅम म आणि ५०- ग्रॅम कारल्याच्या बीया यांचे चूर्ण एकत्र करून सकाळ , संध्याकाळ जेवणानंतर १ ते चमचा घ्यावे, याने मधुमेह हा आजार आटोक्यात राहतो..
एखाद्या स्रिचा वारंवार गर्भपात होत असेल तर तिला जांभळाच्या कोवळ्या पानांचा रस द्यावा, त्यामूळे जीवनसत्व ई. मिळून व प्रोजेस्टेराॕन या हार्मोन्स निर्मितिला, चालना मिळून गर्भपात रोखला जातो,.
दात व हिरड्या कमजोर होउन रक्त येत असेल तर जांभळाच्या सालीच्या काढ्याने गुळण्या कराव्यात. मूळव्याधीतून जर रक्त पडत असेल तर रोज दुपारी जेवणानंतर मूठभर जांभळे खावीत किंवा सरबत मध घालून प्यावे रक्तस्राव बंद होतो.
गर्भावस्थेत जांभळे भरपूर खावीत यात लोह, कॕल्शिअम, व्हिटमिन - क व ई मुबलक असल्याने बाळाची वाढ चांगली होते. अम्लपित्त, अरूची ह्या विकारांवर जांभळाच्या पानांचा रस व गूळ समप्रमाणात घेउन एका भांड्यात ठेऊन त्याला कापडात बांधावे व ४ ते ५ दिवस ऊन्हात ठेवावे त्यानंतल तयार झालेला रस सकाळ , संध्याकाळ काळ - २ चमचे घ्यावा , त्रास कमी होतो.
जांभळाच्या बियांची पावडर गायीच्या दूधात मिक्स करून हा लेप चेहऱ्याला लावल्यास मूरूमे, पुरळ, काळे डाग निघून जातात.जांभळाच्या ज्यूसचा उपयोग अशक्तपणा, अॕनेमिया, यावर लाभदायी होतो, व याच्या नियमित सेवनाने स्मरणशक्ती वाढते,जांभळाच्या रसात आंब्याचा रस मिसळून खाल्ल्यास हिमोग्लोबीन वेगाने वाढते.
शरीराला कुठेही जखम झाल्यास वा खरचटल्यास जांभळाची पाने लावावीत त्यामुळे रक्त थांबते. हातापायांची आग होत असेल तर, पिकलेल्या जांभळाचा रस लावावा, आराम पडतो, जांभळात पोटॕशिअम मोठ्या प्रमाणात असल्याने, उच्च रक्तदाब नियंत्रित राहतो,हृदय सशक्त राहते.
बर्याच अध्ययनानंतर जांभूळ हे अँटिकॕन्सर असल्याचे सिद्ध झाले आहे. केमोथेरपी व रेडिएशन वर जांभूळ दुष्परिणाम होऊ देत नाही.संधिवातात याची साल उकळवून घट्ट मिश्रण करावे व ते लेप म्हणून गुडघे, सांधे यावर द्यावा लगेच आराम पडतो.
चला तर मग पावसाळा सुरू झालेला आहे.जांभळं बाजारात येत आहेत.नक्कीच याचा लाभ घ्या

0 Comments