पर्यावरणाचे रक्षण करणे हे प्रतेकाचे कर्तव्य आहे आणि ते केलेच पाहिजे - राज्यमंत्री संजय बनसोडे

देवणी / प्रतिनिधी : लातूर जिल्ह्यात पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी ३३ टक्के वनक्षेत्र असणे गरजेचे आहे. मात्र राज्यात सर्वात कमी वनक्षेत्र ०.५ इतका लातूर जिल्ह्याचा आहे. त्यामुळे जिल्ह्यात वनक्षेत्र वाढविणे गरजेचे आहे. पर्यावरणाचा रक्षण करणे हे प्रतेकाचा कर्तव्य आहे. आणि ते केलेच पाहिजे नाहीतर ऑक्सिजन अभावी आपले काही खरे नाही असे मत पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी जागतिक पर्यावरण दिनी शनिवार दि.५ जून रोजी देवणी तालुक्यातील नागराळ येथे  २० हजार वृक्षारोपन लागवड मोहिमेच्या शुभारंभ प्रसंगी बोलताना व्यक्त केले. 

      कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑक्सिजन अभावी अनेकांचा बळी गेला. भविष्यात कोणालाही ऑक्सिजनची कमतरता भासू नये व ऑक्सिजन अभावी कोणाचाही बळी जाऊ नये. या उद्दात हेतूने  नागराळ ग्रामपंचायतीच्या वतीने व राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते बसवराज पाटील नागराळकर व दिलीप पाटील नागराळकर यांच्या पुढाकाराने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राज्याचे पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करून २० हजार वृक्षरोपण लागवड मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. 
        नागराळ येथे वनविभाग, उस्मानाबाद अंतर्गत १०० एकर जमीन असून त्यापैकी २० एकर जमीन क्षेत्रावर २० हजार वृक्षरोपणाची लागवड करण्यात येत आहे.

       यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर, माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप पाटील नागराळकर, उदगीरचे माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटूरे, रमेश अंबरखाने, जिल्हा अधिकारी बि.पी.पृथ्वीराज, मूख्यकार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, निलंगा उपविभागीय अधिकारी विकास माने, उदगीर उपविभागीय अधिकारी प्रविण मेंगशेट्टी, उस्मानाबाद वनविभागीय अधिकारी एम. आर. गायकर, वनक्षेत्र अधिकारी गिते, देवणी तहसीलदार सुरेश घोळवे, गटविकास अधिकारी मनोज राऊत, उदगीर पंचायत समिती सभापती शिवाजी मुळे, नागराळचे सरपंच विष्णू ऐनिले, उदगीर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्षष चंदन पाटील नागराळकर, राष्ट्रवादीचे देवणी तालुका अध्यक्ष प्रा.अनिल इंगोले, काँग्रेसचे देवणी तालुका अध्यक्ष अजित बेळकोणे, गोविदराव भोपणीकर, उपसंरपंच रतन पाटील, ग्रामसेवक इश्वर मूर्के, धनजय गूडसूरकर, तलाठी महसूल अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, वनक्षेत्र अधिकारी करर्मचाऱ्यासह गावकरी उपस्थित होते.