ग्रामीण महिला विकास संस्थेच्या वतीने, पाच गावांमध्ये पर्यावरण दिन साजरा.
देवणी / प्रतिनिधी.: देवणी तालुक्यातील.सावरगाव, देवणी खुर्द,  सिधीकामठ, गूरानळ, लासोना.  येथे पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण लागवड करून पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. या कोरोनाच्या महामारी मध्ये ऑक्सीजन चा प्रश्न अतिशय गंभीर झाल्यामुळे वृक्षाचे महत्व सर्वसामान्य सर्वसामान्याला कळाले.  माझं कुटुंब माझी जबाबदारी या कृती प्रमाणे माझे वृक्ष माझी लागवड या कृती प्रमाणे प्रत्येकाने किमान पाच वृक्षलागवड करावे हा संकल्प करण्यात आला.  यावेळी प्रेरक प्ररिका पंढरी जोळदापके, मनीषा मुराळे , लक्ष्मण रणदिवे, गंगाधर बोरुळे, यशोदा  कोंनाळे,यानी आपापल्या गावी प्रत्येक जण पाच जण वृक्षलागवड करण्याचा संगल्प करण्यात आला.