महाराष्ट्र फॉरेस्ट डिपार्टमेंट ने वृक्षाच्या कत्तली केल्यामुळे वन्यजीव सैरभैर
----------------------------------
मोर,हरीण अन्य जीव जीविताना धोका
----------------------------------
देवणी : महाराष्ट्र फॉरेस्ट डिपार्टमेंट रेंज अहमदपूर अंतर्गत देवणी तालुक्यातील नागराळ येथील जंगलातील  लाखो वृक्षाची कत्तल केली असल्याने जंगलात वास्तवात असलेले वन्यजीव मात्र सैरभैर झाले आहेत वनविभागाचे अधिकारी यांनी कायद्याने सवरक्षण देण्याऐवजी या वनाधिकारी यांच्या भ्रष्ट कारभारामुळे प्राण्याच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे कायद्याने सवरक्षण दिलेल्या वन्य जीव प्राण्यांच्या जीवितासाठी
पक्षासाठी निर्माण केलेली पाणस्थळे वृक्ष लागवडीच्या नावाखाली उद्धवस्त केले आहे  मोर ,हरीण, अन्य जीव प्राणी शेतीत आसरा घेत आहेत त्यामुळे पारधी मोर व हरिणाची शिकार करण्याची शक्यता नाकारता येई नाही  त्यामुळे सैरभैर फिरणाऱ्या वन्य जीव यांना वनविभागाचे अधिकारी पळत ठेवून त्यांना सवरक्षण द्यावे अशी मागणी करण्यात येत आहे
---गिरीधर गायकवाड