05 जून विश्व ( जागतिक)पर्यावरण दिन ....

जगाच्या स्वच्छ आणि हिरव्या भविष्यासाठी 1974 पासून हा दिवस साजरा केला जातो . निसर्गा सोबत मानवाचे नाते पुन्हा घट करण्यासाठीच हा दिवस दरवर्षी साजरा होतो . कोणताही सार्वजनिक कार्यक्रम ठरल्यावर "झाडं लावा, पाणी वाचवा " या घोषणा रंगवल्या व छापून वाटल्या म्हणजे सामाजिक उत्तरदायित्व व राजकीय जबाबदारी संपते का ? अस आपले ' पर्यावरण दिन आहे . म्हणजे मानवाने निसर्गा पासून पूर्णपणे फारकत घेतलेली दिसून येत आहे. 1992 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने  300 पानाचा अहवालात जागतिक तापमान वाढीमुळे 'विषाणू  व इतर रोगजंतू वाढीस लागून जगाला अनेक साथीच्या रोगाना समोर जावे लागेल .असा इशारा दिला होता ; पण लक्षात कोण घेतो ते फक्त कागदपत्रे राहीले . स्वार्थासाठी व सुखसोयीसाठी हजारो वर्षांपासून ऋषीमूनीसारखे जंगलात ,रस्त्यावर ऊन, वारा , पाऊस अंगावर झेलून निसर्गाचा समतोल व मानवाला ऑक्सिजन देणारे वृक्ष नामशेष होत गेले. झाडाच्या संगतीतअसणारे पशु पक्षी बेपत्ता झाले . मागील दोन वर्षात ऑमेझान ,कॅलिफोर्निया , सायबरेरिया ,असटरलिया, इंडोनेशिया या देशामध्ये लागलेल्या व लावलेल्या आगीत सुमारे दोन कोटी हेक्टर जंगलाची राख झाली . विचार करा पिंपळ 24 तास 100%ऑक्सिजन देतो . वड 20 तास 80% . कडुलिंब 75% तर चिंच 68% टक्के प्राणवायू देतात .वड आणि पिंपळ हे आधुनिक वहेटंलेटर आहेत.  विशेष म्हणजे  कडुलिंब 18 तास ऑक्सिजन देतो . याचा विसर पडल्यामुळे या कोरोना महमारीत ऑक्सिजन न मिळाल्यामुळे जवळचे नातेवाईक आपल्यात राहीले नाहीत . आता तरी सावध होऊ या , आपले भविष्य हे सामायिक आहे . वैयक्तिक नाही . म्हणून पुढच्या पिढ्यांना शुद्ध पाणी, स्वच्छ आणि प्रसन्न निसर्ग द्यावयाचा असेल तर आपल्याला वैयक्तिक व सार्वजनिक ठिकाणी एकत्र येऊन जसे अन्न , वस्त्र , निवारा , पाणी हे मानवाच्या मुलभूत गरजा आहेत . तसे पर्यावरण संवर्धन ही काळाची मोठी गरज आहे . हे प्रत्येकाने जपू या.
सुखी रहा , आनंदी रहा . सर्वाना पर्यावरण दिनाच्या "बि मिडिया माध्यम समुह ग्रुप" तर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा...