परिवर्तन हॉस्पिटल सेवेचे उदघाटन.... 

कुर्ली / प्रतिनिधी : दि. 31मे. 2021.ला परिवर्तन एज्युकेशन सोसायटी संचलित,  परिवर्तन हॉस्पिटल  सेवेचे उदघाटन कुर्लीचे आदर्श शिक्षक नारायण शिंदे गुरुजी व  प्रथम लोकनियुक्त सरपंच दादासाहेब पाटील यांच्या हस्ते झाले. संस्थापक प्रा दत्ता हेगडे यांनी सर्वांचे स्वागत केले  व म्हणाले कुर्लीत सर्वांना आरोग्य सेवा मिळावी व माझ्या हातून गावकऱ्यांच्या सहकार्याने लोकांची  सेवा घडावी म्हणून मी ही सेवा सुरु केली आहे.. सर्वांनी या सेवेचा लाभ घ्यावा व सहकार्य करावे.. तसेच ही सेवा मी कायम सुरु ठेवणार आहे.या सेवेला पोपट शेठ शिंदे, महेश शेठ विलास शिंदे, प्रशांत शेठ धोंडीराम शिंदे,  सचिन शेठ शहाजी पाटील, विनोद शेठ नारायण शिंदे, अजय शेठ डिसले, शशीकांत कांबळे, या दानशूर लोकांनी आरोग्य शिबिराला  या कार्यक्रमाला पोलीस उपाधीक्षक dysp  मा. अंकुश इंगळे साहेब  पोलीस सब इन्स्पेक्टर जाधव साहेब, डॉ. प्रभाकर सदामते, डॉ. अनिल पुजारी,संचालक संगीता जावीर, नर्स अलका मॅडम,  स्वाभिमानी चे जिल्हाध्यक्ष जगदीश जावीर, माजी चेअरमन समाधान पाटील,उल्का पिसाळ  दिपक जाधव,  , बाळासाहेब कांबळे, नितीन कांबळे, मोना भिसे हे उपस्थित होते..