महाराष्ट्रातील सुप्रसिध्द साहित्यिक विलास सिंदगीकर  यांचा औरंगाबाद विभागाचे पदवीधर आ.सतीशभाऊ  चव्हाण यांच्या हस्ते सत्कार संपन्न.

जळकोट / प्रतिनिधी :  केकत सिंदगी(जि. लातुर) येथील क्रांती माध्यमिक विद्यालयाचे उपक्रमशील मुख्याध्यापक तथा सुप्रसिध्द साहित्यिक विलास सिंदगीकर यांचा महाराष्ट्र शासन : महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई या महामंडळाच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल औरंगाबाद पदवीधर मतदारस संघाचे विद्यमान आ.मा.श्री.सतिशभाऊ चव्हाण साहेब  यांच्या शुभहस्ते शाल, श्रीफळ, पुष्पहार देऊन कृषी उत्पन्न बाजार समिती, जळकोटच्या सभागृहात सूह्र्दय  सत्कार करण्यात आला.
         यावेळी जळकोट तालुका  कृषी उत्पन्न बाजार समिती जळकोटच्या वतीनेही  सभापती मा.श्री.मन्मथअप्पा किडे साहेब यांच्या  शुभहस्ते  विलास सिंदगीकर यांचा  सत्कार करण्यात आला.                     
           या कार्यक्रमाच्या वेळी   जळकोट राष्ट्रवादी काँ. पक्षाचे ता.अध्यक्ष मा.श्री .अर्जुनमामा आगलावे पाटील,जळकोट तालुका राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष मा .श्री. मारोती पांडे,जळकोट तालुका शिवसेना प्रमुख मा.श्री .संगम टाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे  युवा नेते विठ्ठल चव्हाण, जळकोट तालुका संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष संग्राम पाटील, जळकोट तालुका राष्ट्रीय काँग्रेस पक्ष मागास सेल अध्यक्ष संग्राम कांबळे,धोंडराम पाटील, जळकोट तालुका पत्रकार संघाचे सचिव कैलास पाटील, काँ.विठ्ठल चंदावार,युवा नेते संग्राम नामवाड,उस्मान मोमीन,महेश धुळशेट्टे,दिलीप कांबळे,आकाश वाघमारे,प्रत्रकर राजेंद्र वाघमारे,युवा नेते गजानन दळवे,भानुदास लांडगे, मानेमामा,आणि जळकोट तालुका रा. काँ.शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष विनायकराव जाधव,प्रकाश मरतूळे आदी मान्यवर उपस्थित होते.
            या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संयोजक विनायकराव जाधव यांनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.चंद्रकांत मोरे यांनी तर,प्रास्ताविक आणि आभार विनायकराव जाधव यांनी मांडले.या कार्यक्रमासाठी शिक्षक आणि कार्यकर्ते उपस्थित होते.