नागराळ येथील लाखो वृक्षाच्या कत्तली करून   हजारो वृक्ष लागवड करण्याचे ढोंग करणाऱ्या वनाधिकारी यांच्यावर कार्यवाही करा मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी
----------------------------------
देवणी/ प्रतिनिधी :  तालुक्यातील नागराळ येथे महाराष्ट्र फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या वतीने येथे अस्तिवात असलेली लाखो झाडांची कत्तल करून  नवीन हजारो झाडे लावण्याचे ढोंग करून दि पाच मे रोजी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून राज्याचे राज्य मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते  जिल्ह्यचे जिल्हाधिकारी व मुख्याधिकारी यांच्या साक्षीने  वीस हजार वृक्ष लागवड करण्याचा ढोंग येथील वनाधिकारी यांनी रचला आहे जवळपास तीस चाळीस एकरात असलेली घनदाट वृक्ष यांची जेसीबी पोकल्यानंच्या  साह्याने  कत्तली करून अक्षरशः संपुर्ण जंगल नष्ट केले आहे यात वृक्ष लागवड च्या नावाखाली मोठा भ्रष्टाचार केला आहे शत कोटी वृक्ष लागवडीला मूठमाती देत  शासनाची दिशाभूल करून  लाखो रुपयांना शासनाला गंडविणाऱ्या वनाधिकारी यांच्यावर कारवाई करा अशी मागणी मुख्यमंत्री यांच्याकडे करण्यात आली आहे 
ऐन कोरोनाच्या काळात देश भरातील कोरोना बधितांना ऑक्सिजन अभावी आपला प्राण गमवावा लागला मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन ची आयात करावी लागली  अश्या परिस्थितीत महाराष्ट्र फॉरेस्ट डिपार्टमेंट च्या अधिकारी यांनी लाखो वृक्षाच्या कत्तली केल्या हजारो ऑक्सिजन अभावी माणसे मारण्यात थोडाफार हातभार लावला म्हणून  वृक्ष तोड करणाऱ्या अधिकाऱ्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी मुख्यमंत्री याना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे
 यापूर्वी नागराळ येथे लागवड केलेल्या वृक्ष लागवड संदर्भात एकूण किती खर्च झाला व कोणत्या प्रकारची झाडे  लावली होती  सध्या ही वृक्ष तोड करून वृक्ष लागवड करण्यासाठी आजतागायत किती खर्च झाला ही वृक्ष तोड करण्यासाठी कोणी आदेशीत केले या तीस चाळीस एकरांवर लागवड केलेली सर्वच झाडे  ऑक्सिजन विरहित होती का ? कोरोना काळात वृक्षावर बुलडोझर चालविणे म्हणजे  माणसावर बुलडोझर चालविल्या सारखे नाही का
या सर्व बाबीची उच्च स्थरिय चौकशी करून वनाधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे