प्रेरकांचे मानधन अद्याप ही थकितच; निवेदनाद्वारे केली मागणी
-------------------------------------------------
लोहा/प्रतिनिधी : साक्षर भारत कार्यक्रमात काम करणाऱ्या राज्यातील चौदा हजारांवर प्रेरक प्रेरिका यांना मानधनासाठी गत अनेक दिवसांपासून मानधन प्रलंबित असल्यामुळे मानधनापासून वंचित राहावे लागले.अनेकवेळा मोर्चे, आंदोलने करून ही तत्कालीन निद्रिस्त शासन प्रशासनाला अद्याप ही जाग आलेली नाही.करिता हिवाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थीत करण्यासाठी प्रेकरकांच्या शिष्टमंडळाने नांदेडचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांना दिनांक०८.०६.२०२१ रोजी निवेदन देवून मागणी करण्यात आली आहे.
पावसाळी अधिवेशन मध्ये तारांकित प्रश्न उपस्थित करणे, साक्षर भारत प्रेरक व प्रेरीकाचे थकित मानधन मिळणे,शासकीय योजनेमध्ये समाविष्ट करण्यात यावे या प्रलंबित प्रश्नांबाबत निवेदन देण्यात आले. अनेक वेळा निवेदन देऊन सुद्धा 2012 पासून असलेले थकित मानधन प्रेरक व प्रेरीका यांना देण्यात आले नाही. प्रेरकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. मुख्यमंत्री फडवणीस साहेब यांना निवेदन देण्यातआले.दिनांक 20 12 2019 रोजी पत्र पुढील कार्यवाहीसाठी स्कुल एज्युकेशन डिपारमेंट कडे पत्र पाठवले आहे.वरील विषयानुसार विनंती करून सुद्धा महाराष्ट्र राज्यामध्ये मराठवाड्यातील सात जिल्हे व विदर्भ तीन जिल्हे साक्षर भारत योजनेमध्ये असे महाराष्ट्र राज्यातील दहा जिल्हे या योजनेमध्ये असून सुद्धा साक्षर भारत प्रेरक चे मानधन थकित मानधान असल्यामुळे एकूण महाराष्ट्र राज्यातील 14 हजार 630 योजनेमध्ये त्याचे थकीत मानधन असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.तरी पावसाळी अधिवेशन मध्ये प्रश्न उपस्थित करण्यात यावे त्याकरता निवेदन देण्यात आले.
सदरील निवेदनाच्या प्रती मा.बच्चुभाऊ कडु शालेय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य, माननीय आमदार मोहन राव हंबर्डे नांदेड दक्षिण,उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर ,नायगाव चे आमदार राजेश पवार, सह मुख्य कार्यकारी अधिकारी नांदेड, यांना निवेदनाच्या प्रती देण्यात आलेल्या आहेत.सदरिल निवेदनावर यज्ञकांत पाटील कोल्हे यांची स्वाक्षरी आहे.

0 Comments