"कर्तबगार धाडसी रणरागिनी पोलीस:- श्रीमती.सीमा साहेबराव बडे"

चाकुर तालुक्यातील हाडोळी या गावची ओळख सैनिकांचे गाव म्हणून जिल्ह्यात परिचित आहे. याच भूमीत आयबीएन लोकमतचे उत्कृष्ठ निवेदक विलास बडे, प्रसिद्ध नामांकीत वकील अॅड विनोद चाटे, अँड सुभाष समुखराव, डॉ.बालाजी समुखराव , अशा सुपुत्रांचा जन्म झाला. त्यामुळे गावचे नाव अधिक समृद्ध झाले.
   या गावाला खेळुडींची खूप मोठी परंपरा आहे. गावातील अनेक खेळाडूंनी कब्बडी,खो,खो, सारख्या खेळात राज्याचे नेतृत्व केले आहे. यात मुलींनी तर खो,खो,या खेळात आपल्या गावचे नाव संपूर्ण राज्यात गाजविले.  वैशाली या मुलीने खो,खो,या खेळाचे राज्यांचे नेतृत्व करुन उत्कृष्ठ कामगिरी केली. तर याच संघात ज्योती मुंडे,केवळ बडे, चंद्रभागा चाटे, तर पोलीस सेवेत उत्कृष्ठ सेवा बजावत असलेली सिमा बडे यांनीही दमदार कामगिरी केली.  या सर्व खेळाडूंना बालाजी काटे, तुकाराम गुरनाळे, माजी प्राचार्य निवृत्ती कानवटे, माजी प्राचार्या श्रीमती रसिकाताई देशपांडे मॅडम,यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
    या सर्वांच्यापेक्षा जिणे स्वत:च्या स्वकृर्तत्वार आकाशाला गवसणी घालून आपला संसार ,नौकरी , सांभाळून स्वत:च्या हिंमतीने आपल्या आई वडिलांचे ,गुरुजनांचे व आपल्या गावचे नाव रोशन केले ती रणरागिणी म्हणजे हाडोळीची उस्मानाबाद येथे गेल्या २० वर्षांपासून पोलीस हवालदार पदावर कार्यरत असलेली सिमा साहेबराव बडे होय.

  " इतिहासालाही हेवा वाटे
   अशी असावी तुझी गाथा 
      तू तर आहेस ...
  संकेत सोहंमची माता "

जिणे पोलीस खात्यात आजपर्यंत २० वर्ष सेवा करुन खात्यात आणि समाजात वेगळा ठसा उमटविला. अशा कर्तबगार आणि धाडसी महिलेचा जन्म सैनिकांचे गाव हाडोळी येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. वडिलांचे नाव साहेबराव बडे तर आईचे अहिल्याबाई हे दोघेही निरक्षर असल्याने सिमाचे प्राथमिक शिक्षण हाडोळी येथील प्राथमिक शाळेत झाले. सिमा लहानपणापासून खेळात आणि अभ्यासात निपुण, आणि चुणचुणीत होती. गावी ७ वी पर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी झरी बु येथील ग्रामीण भागात नामांकीत असलेली शाळा सिद्धेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय या शाळेत प्रवेश घेतला .या शाळेतच त्यांच्यातील कलागुणांना व खेळाला अधिक वाव मिळाला. सिध्देश्वर विद्यालयातील अनुभवी व तज्ञ शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे ती अभ्यासाबरोबर खेळातही चमकु लागली. ८ वी ते १० पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर येथील उच्च माध्यमिक विद्यालयात प्रवेश घेतला.
    ११ वी १२ वीला शिकवणारे अनुभवी आणि तज्ञ शिक्षक प्रा. वैजनाथ सुरनर,प्रा. मारोती बुद्रुक ,प्रा. दयानंद झांबरे,अशा तज्ञ प्राध्यापकांच्या मार्गदर्शनांने  सिमाच्या ज्ञानाच्या कक्षा अधिकच रुंदावल्या आणि याच महाविद्यालयातून
त्यांनी इयत्ता १२ वीची परीक्षा उत्तीर्ण केली.विशेष म्हणजे १२वी राज्यशास्त्र या विषयात १००पैकी ९७ गुण घेऊन सर्वप्रथम येण्याचा बहुमान पटकावला.
    पुढे त्यांना महाविद्यालयीन शिक्षण घेण्याची खूप इच्छा होती परंतु आई वडीलांनी जोडवाडी येथील शिवराम दराडे यांच्याशी विवाह केला. विवाह झाल्यानंतर सुध्दा सिमा मधील खेळाडू वृत्ती गप्प बसत नव्हती ,आपण काहीतरी केले पाहिजे आणि स्वत:च्या पायावर उभारले पाहिजे यासाठी त्या प्रयत्नशील होत्या.  पोलीस सेवेत भरती व्हावे आणि देश सेवा करावी अशी त्यांची मनोमन तीव्र इच्छा होती.
    त्यातच २००१ मध्ये उस्मानाबाद येथे पोलीस शिपाई पदासाठी जाहिरात निघाली आणि ती सिमाने वाचली त्यावेळी त्यांना १ महिन्यांचे लहान मुल होते परंतु त्या डगमगल्या नाहीत. तशाच अवस्थेत लहान मुलांला सोबत घेऊन त्या पोलीस भरतीला हजर राहून रणींगमध्ये सर्व मूलीमध्ये प्रथम येऊन आपली गुणवत्ता सिद्ध करुन  त्या भरतीत सलेक्ट झाल्या आणि तिथुनच त्यांच्या जीवनाला नवीन कलाटणी मिळाली 
पोलीस सेवेचे प्रशिक्षण घेऊन त्यांनी आपल्या कार्यास सुरुवात केली. भुम, परंडा, ग्रामीण पोलीस स्टेशन उस्मानाबाद, येथे उत्कृष्ठ कार्य केले आहे.
  आतापर्यंत ११७ महिलांचे दुभंगलेले संसार सिमा यांनी आपल्या चातुर्याने "महिला तक्रार निवारण केंद्र उस्मानाबाद "यांच्या माध्यमातून व्यवस्थित जोडले आहेत. ते जोडपे आज आनंदाने संसार करत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन विशेष पोलीस महानिरीक्षक औरंगाबाद परिक्षेत्र औरंगाबाद येथील आयजी भगवंतराव मोरे व पोलीस अधीक्षक  राजतिलक रोशन, यांच्या शुभहस्ते उत्कृष्ठ कार्य केल्याबद्दल रोख रक्कम व सन्मान पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.आतापर्यंत त्यांना उत्कृष्ठ कामगिरी केल्याबद्दल एकूण ६३ पारितोषिक मिळाले आहेत. हाडोळी ग्रामस्थांच्या वतीने "लेक लाडकी"सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले आहे
    सध्या त्या उस्मानाबाद येथे "पोलीस हवालदार" या पदावर कार्यरत आहेत.त्यांना पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकारी पोलीस निरीक्षक काळे साहेब, वाकडे साहेब,यांचे वेळोवेळी बहुमोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.
  त्यांच्या संसाररुपी वेलीला संकेत आणि सोहंम ही दोन मुले आहेत.
   पोलीस खात्यात जास्तीत जास्त मुलींनी यावे कारण आपल्या कलागुणांना येथे वाव मिळतो.आपण महिला असलो तरी समाजातील प्रत्यक्ष व्यक्तिशी आपला संबंध आणि महिला म्हणून आपण ती जवाबदारी कशी पार पाडायची हे पण शिकता येते हे त्या आवर्जून बोलून दाखवतात .
    म्हणुन शेवटी म्हणावे वाटते ....
    "जब नारी में शक्ती सारी 
   फिर क्यों नारी हो बेचारी 
  अबला नही ,नारी हैं सबला 
  करती रहती जो सबका   भला"
आजची नारी अबला नव्हे तर सबला आहे.अशा नारीस त्रिवार वंदन व पुढील कार्यासाठी खूप खूप मंगलमय शुभेच्छा.