उदगीर तालूका जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्था देवणी जळकोट उदगीर येथे पतसंस्थेच्या नुतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार संपन्न
देवणी / प्रतिनिधी : आज उदगीर तालूका जिप शिक्षक सहकारी पतसंस्थेत कास्टट्राईब शिक्षक संघटनेच्या माध्यमातून पतसंस्थेचे नुतन चेअरमन आमचे मित्र आदरणीय चंद्रकांत कांबळे सर व पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन आमचे मित्र आदरणीय नंदकुमार काळे सर व बहूजनाना फक्त मत देण्याचा अधिकार नव्हे तर त्या मतांच्या शक्तीने  पतसंस्थेचे सर्वोच चेअरमन पद अनुसुचित जातीतील व्यक्तीला मिळवून देणारे  अष्टपैलू व्यक्तीमत्व पतसंस्थेचे विद्यमान सचिव माझे जिवलग मित्र आदरणीय सर्जेराव भांगे सर यांचा सत्कार संपन्न झाला*
 या छोटेखानी कार्यक्रमाचे अध्यक्ष कास्टट्राईब संघटनेचे जिल्हाअध्यक्ष आदरणीय नागसेन कांबळे सर होते 

या प्रसंगी कास्टट्राईब संघटनेचे विभागीय अध्यक्ष आदरणीय ढगे सरांनी पतसंस्थेत राबवत असलेल्या विविध शिक्षक कल्याणकारी योजने बद्द्ल समाधान व्यक्त केले कन्यादान योजना, दिपावली कर्ज योजना, आर्वत ठेव योजना व जूलै महिन्यापासून सुरू होणारी शैक्षणीक कर्ज योजना यामुळे शिक्षक बांधवांचा विश्वास पतसंस्थेच्या संचालक मंडळावर वाढला आहे बहूजन समाजातील व्यक्तीला अनुसुचित जातीला मागील 43 वर्षात चेअरमन पद मिळाले नव्हते ते पद आज मिळाले यामुळे पतसंस्थेत जातीपातीचे राजकारण न होता डॉ बाबासाहेबांच्या, फूले शाहू विचारांचा अवलंब करणारे संचालक मंडळ आहे हे कार्य असेच चालावे कास्टट्राईब संघटना नेहमी पतसंस्थेच्या विकासासाठी सहकार्य करेल असा विश्वास व्यक्त केला*

*या प्रसंगी पतसंस्थेला आपल्या कार्यकुशलतेने सोनेरी वैभव प्राप्त करून देणाऱ्या पतसंस्थेच्या मा. महिला चेअरमन आमच्या भगीनी आदरणीय शांता लोहारे यांनी दोन वर्षात केलेले कार्य व सभासद बांधवांचा व भगीनींचा वाढलेला विश्वास हेच पतसंस्थेचे बळ आहे आरोग्य शिबीर ,महीला मेळावा हळदीकुंकू कार्यक्रम या माध्यमातून महीलांचा पतसंस्थेत सहभाग वाढवून ठेवी वाढवण्याचे कार्य पुढेही चालू राहील असे सांगीतले*

*विविध माध्यमातून पतसंस्थेत शिक्षक बांधवांचे सहकार्य मिळत आहे यामुळेच पतसंस्थेने आज पर्यंत जिल्हा मध्यवर्ती बॅकेचे जवळपास १४ कोटी रुपयांची कर्ज परतफेड केलेली आहे असेच सहकार्य राहीले तर पुढील दोन वर्षात पतसंस्था स्वबळावर आणून सभासदांच्या विश्वासाला सार्थ ठरूत नुतन चेअरमन यांना प्रत्येक बाबतीत सहकार्य करीत राहूत असा शब्द भांगे  सरांनी दिला*

*सत्काराला उत्तर देताना नुतन चेअरमन चंद्रकांत कांबळे सरानी सांगीतले की काय करावे यापेक्षा काय करू नये यावर माझा विश्वास आहे पतसंस्थेत मी संपुर्ण तन मन वेळ देऊन सभासदांनी दिलेल्या संधीचे सोन करून दाखवूत असे विचार मांडले*

*या प्रसंगी कास्टट्राईब संघटनेचे , जिल्हाध्यक्ष नागसेन कांबळे देवणी ता अध्यक्ष चंद्रकांत मोठेराव मुख्याध्यापक भरत निलेवाड , राठोड सर , बालाजी साखरे सर प्रशांत बिरादार सर यांनी नुतन कार्यकारणीस शुभेच्छा पर विचार व्यक्त केले*

*सदरील कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक रमेश मोटे सर , सुर्यकांत बर्गे सर , कांबळे सर कास्टट्राईब संघटनेचे व पतसंस्थेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते*

*कार्यक्रमाचे सुत्रसंचलन चंद्रकांत मोठेराव सरानी केले तर आभार प्रदर्शन राठोड सरांनी केले*