World Environment Day-2021
Ecosystem Restoration
देवणी : उद्या 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात येणार असून "परिस्थितिकीचे पुनरुज्जीवन" यावर्षी च्या पर्यावरण दिनाचे ब्रीदवाक्य आहे.
मानवी विकासासोबत व माणसाच्या विविध प्रकारच्या आर्थिक व विकासात्मक क्रियांमुळे निसर्गाची हानी होत गेल्यामुळे ग्लोबल वार्मिंग सह नैसर्गिक आपत्तीचे संकट जगातील सर्वच राष्ट्रांत समोर उभे राहिलेले आहे.
सजीव सृष्टी मधील अनेक प्रजाती ह्या नष्ट झालेल्या असून अनेक प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.
माणसाचे भविष्य सुकर करण्याच्या दृष्टिकोनातून व सजीवास पोषक वातावरण निर्मितीच्या दृष्टीने परिस्थितिकीचे पुनरुज्जीवन करणे ही काळाची गरज आहे. आपल्यासमोर असलेल्या ज्या वनस्पती व प्राण्यांच्या जाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत, त्यांना संरक्षण देऊन, त्यांचे संगोपन व संवर्धन करण्याचा प्रयत्न करण्याची गरज आहे.
हीच बाब विचारात घेऊन तहसील कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी लोकवर्गणी व श्रमदानाच्या आधारे आज तहसील कार्यालयाच्या पाठीमागील परिसरामध्ये मियावाकी पद्धतीने 1000 विविध प्रजातीच्या झाडांची लागवड केली.
यावेळी तहसील कार्यालयातील सर्व नायब तहसीलदार, अव्वल कारकून, मंडळ अधिकारी, महसूल सहाय्यक, तलाठी, शिपाई, कोतवाल व ऑपरेटर्स, सेतू सुविधा केंद्राचे सर्व कर्मचारी यांची उपस्थिती होती.

0 Comments