कोविडमुळे मृत पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना विशेष सहाय्य बाबत...
विशेष अर्थसहाय्य योजनेच्या मंजूर 149 अर्जदारांना निवृत्ती वेतन लाभ जूलै पासून सुरु होणार
जिल्ह्यातील 57 बालकांना बालसंगोपन योजनेचा लाभ मंजूर; उर्वरित 151 बालकांना या योजनेचा लाभ लवकरच मंजूर होणार*

19 साथीच्या प्रादुर्भावामुळे मृत पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना विशेष सहाय्‍य कार्यक्रमाअंतर्गत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य  निवृत्ती वेतन योजना त्याचप्रमाणे महिला व बालविकास विभागातील  1. बालसंगापन योजना, 2. शिशुगृह योजना 3. बालगृह योजना 4. शुभमंगल सामूहिक विवाह योजना ,सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना या योजनांचा लाभ देण्यासाठी लातूर जिल्हयात सर्वेक्षण करण्यात आलेले आहे.
 त्यापेकी विशेष सहाय्य कार्यक्रमाअंतर्गत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनांचा जिल्हयातील तहसिलदार यांच्या मार्फत कोविड साथीच्या प्रादुर्भावामुळे मृत पावलेल्या व्यक्तींच्या घरोघरी केलेल्या सर्वेक्षणातून विशेष सहाय्य योजना अंतर्गत एकूण 283 अर्ज प्राप्त करुन घेण्यात आले आहेत. सदर 283 अर्जापैकी 149 अर्ज मंजूर करण्यात आलेले असून व 5 अर्ज निकषांची पूर्तता करु न शकल्याने अर्ज मंजूर करता आले नाहीत. 
तसेच 129 अर्ज संबंधीत तालूक्याच्या संजय गांधी निराधार अनुदान समितीच्या पुढील बैठकीमध्ये निर्णयास्तव ठेवण्यात येत आहेत. विशेष अर्थसहाय्य योजनेच्या मंजूर 149 अर्जदारांना निवृत्ती वेतन लाभ जूलै महिन्यापासून सुरु करण्यात येत आहे. प्रलंबीत 129 अर्जावर लवकरात लवकर कार्यवाही करण्याबाबत जिल्हयातील सर्व तहसिलदार यांना जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी निर्देश दिलेले आहेत. त्याचप्रमाणे राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेअंतर्गत 4 पात्र लाभार्थ्यांना प्रत्येकी रु. 20 हजार एवढे अनुदान वितरीत करण्यात आले आहे.
तसेच कोविड-19 या अभुतपुर्व महामारीमुळे मृत्यूमुखी पडलेल्या पालकांच्या 0 ते 18 वयोगटातील बालकांना त्यांचे कायदेशीर न्याय व हक्क मिळवून देणे, काळजी व संरक्षण करुन त्यांना बालगृहात दाखल करणे, त्यांना बालसंगोपन तसेच इतर शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे, तसेच सदर बालकांची सर्वतोपरी संरक्षण करुन शोषणाला बळी पडणार नाहीत किंवा बाल कामगार अथवा तस्करी सारख्या गुन्हेगारीमध्ये सापडणार नाहीत यासाठी दि. 7 मे 2021 रोजीच्या शासन निर्णयानुसार जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय कृतीदल (TASK FORCE) गठीत करण्यात आलेली आहे. या कृतीदलामध्ये पोलीस विभाग, आरोग्य विभाग, विधि सेवा प्राधिकरण, महानगरपालिका, महिला व बाल विकास, बाल कल्याण समिती यांचा समावेश आहे.
लातूर जिल्हयातील कोविड-19 या आजारामुळे मृत्यूमुखी पडलेल्या पालकांना 0 ते 18 वयोगटातील 206 बालकांचा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा कृतीदलामार्फत शोध घेतलेला असून त्यामध्ये 04 बालकांचे आई-वडील मयत झालेली व 202 बालक ही एकल पालक आढळून आलेली आहेत. सदर 206 बालकांचे जिल्हा महिला व बाल विकास विभागामार्फत गृहभेट घेवून त्यांची संपुर्ण चौकशी करण्यात आलेली असून सध्या 57 बालकांना बालसंगोपन योजनेचा लाभ मंजूर करण्यात आलेला आहे. तसेच उर्वरित 151 बालकांना बालसंगोपन योजनेचा लाभ तात्काळ मंजूर करण्याची कार्यवाही चालू आहे. त्याचप्रमाणे कोविड-19 मध्ये दोनही पालक गमावलेल्या 04 अनाथ बालकांना महिला व बाल विकास विभाग, शासन निर्णय दि. 17 जून 2021 अन्वये रु. 5 लाख मुदत ठेव करण्याची कार्यवाही  टास्क फोर्स मार्फत चालू आहे.
त्याचप्रमाणे कोविड-19 या आजारामुळे मृत्यु झालेल्या व्यक्तीचे नातेवाईक, इतर असे कोणीही व्यक्ती ज्यांना कोविड-19 या आजारामुळे बालकांचे आई किंवा वडील मृत्यु झालेले आहेत व त्यांना त्यांच्या मुलांची माहिती आहे. अशा सर्वांनी जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय येथे संपर्क साधावे असे आवाहन जिल्हाधिकारी  पृथ्वीराज बी.पी. यांनी  एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.