शेतकऱ्यांच्या वयक्तिक लाभाच्या नावाखाली नरेगाच्या विहिरीत मिळते सूट ! 
देवणीतील तांत्रिक अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांची भरमसाठ लूट..!
----------------------------------
देवणी / प्रतिनिधी (गिरीधर गायकवाड) : शेतकरी यांच्या सर्वांगीण विकासासाठी  नरेगा अंतर्गत तालुक्यातील बऱ्याच शेतकऱ्यांना वैयक्तीक लाभ म्हणून रोहयोच्या वतीने अनेक विहिरी मंजूर करण्यात आल्या आहेत शेती ओलिताखाली यावी शेतकऱ्यांचे दारडोई उत्पन्न वाढावे त्यांचा सर्वांगीण विकास वाव्हा हा उदात्त हेतू ठेऊन शासनाने नरेगा(रोहयो)अंतर्गत देवणी तालुक्यातअनेक विहिरी मंजूर केल्या आहेत यात काही जाचक अटी आहेत या विहिरी या मजुरामार्फत काढायच्या आहेत  स्थानिक च्या मजुरांना काम देता यावे असाशासनाचा हेतू असावा परंतु हे काम अक्षरशः मजुराने करणे शक्य नसले तरी ह्या विहिरी मशिन यंत्राने काढून  शासकीय नियमाप्रमाणे जवळच्या म्हणजे नातेवाईक किंवा काही घरचे मजूर दाखवून सर्रासपणे मस्टर भरून या योजनेचा लाभ घेतला जातो ही योजना शेतकऱ्यांसाठी व्यक्तीक लाभाची असल्याने व मजुराने शक्य नसल्याने मशिनने काम करून  मजुरांचे मस्टर भरावे लागतात म्हणून हे काम मजुरांमार्फत करावे लागते म्हणून शेतकरी यांना कोंडीत पकडून शेतकऱ्यांचा व्ययक्तिक लाभ असल्याने शेतकरी यांना मजुरां ऐवजी मशिन ची मिळते सूट मात्र देवणी पंचायत समितीच्या नरेगा विभागातील तांत्रिक अभियंत्याकडून होतेय भरमसाठ लूट
 देवणी पंचायत समितीत कार्यरत तांत्रिक अभियंते कंत्राटी असल्यामुळे यांच्यावर कोणत्याच अधिकारी यांचे नियंत्रण नाही  कायमस्वरूपी शासकीय सेवेत नसल्याने  यांची भूमिका" मला नाही अब्रू मी कोणाला घाबरू " चले तो शाम तक नहि तो चाँद तक या भूमिकेतुन भरमसाठ लूट केली जात आहे गटविकास अधिकारी हे गटविकास अधिकारी पदांवर समाधानी नाहीत व्यक्तिगत विकासासाठी विविध स्पर्धा परीक्षा तयारीसाठी वारंवार रजेवर जात असल्याने देवणी तालुक्याला वेळ देणारा अधिकारी मिळत नसल्याने पंचायत समितीच्या कर्मचारी यांच्यावर कसलीच धाक राहिली नाही कधीही या कधीही जा " आओ जाओ घर तुम्हारा " अशी परिस्थिती निर्माण झाली आहे कर्मचारी वेळेवर उपस्थित प्रत्येक टेबल वर रुपये घेतल्याशिवाय काम करीत नाहीत किंवा मुख्यलयी राहत नाहीत अशी उपोषण कर्त्या ची ओरड चालू आहेत एम पी एस सी च्या उच्च पदवी पास होऊन आलेल्या गटविकास अधिकारी यांच्यावर निष्क्रिय गटविकास अधिकारी असल्याचा आरोप लोक करीत आहेत हे केवळ भ्रष्ट कर्मचारी यांच्यामुळे गटविकास अधिकारी यांची बदनामी होत आहे  तरीही गटविकास अधिकारी यांचे या भ्रष्ट कर्मचारी यांच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे  गटविकास अधिकारी यांचे प्रशासन वादाच्या भोवऱ्यात आहे  घरकुला चा विषय असो की रोहयो चा इतर कोणत्या विविध विभागाच्या टेबलावरील प्रशासकीय काम असो पैसे घेतल्या शिवाय कोणतेच काम होत नाही शासकीय विविध योजना लोकांपर्यंत पोहचविणे त्यांचा त्याला लाभ मिळवून देणे हे प्रशासनाचे काम असताना सुद्धा माजी कृषी मंत्री शरद पवार यांच्या नावे असलेल्या शरद पवार ग्राम समृद्धी योजनेला फाटा दिला आहे अनेक शेतकऱ्यांना वंचित ठेवण्यात आले आहे शेतकरी यांच्या शासकीय योजनेतील अर्धेअधिक पैसे कर्मचारी अधिकारी यांनाच देऊन जावे लागत आहे शासकीय योजना नको प्रशासनातील भ्रष्टाचारी कुत्रे आवर म्हणायची वेळ शेतकरी यांच्यावर आली आहे.