जेष्ठ पत्रकार तथा अर्थतज्ज्ञ पी.साईनाथ यांना रेमन मॅगसेसे पुरस्कार..
पुणे : आशियाचा नोबेल म्हणून ओळखला जाणारा रेमन मॅगसेसे पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ पत्रकार आणि अर्थतज्ज्ञ पी.साईनाथ यांना जपानचा अतिशय प्रतिष्ठेचा फुकुओका पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे प्रथमत: हार्दिक अभिनंदन!
जेष्ठ पत्रकार आणि 'पीपल्स आर्काइव ऑफ रूरल इंडिया' चे संस्थापक संपादक पी. साईनाथ यांना या वर्षीचा जपानच्या प्रतिष्ठित ग्रॅंड फुकुओका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी पाच राज्यांतील गरिबांतील गरीब अशा दहा जिल्ह्यांतून सुमारे एक लाख किमी.चा प्रवास केला.त्यांतील पाच हजार किमी.अंतर पायी चालत ते फिरले आणि वंचित समाजाचे सूक्ष्म निरीक्षण व सर्वेक्षण केले.या जिल्ह्यांतील सामाजिक परिस्थितीवर त्यांनी अठरा महिन्यांतील काळात जे पाहिले व अनुभविले,त्यांवर एकूण ८४ शोधनिबंधात्मक लेख लिहिले.ते प्रसिद्घही झाले.
त्यांनी या शोधनिबंधात्मक लेखांधारे 'एव्हरीबडी लव्हज् ए गुड ड्राउट : स्टोरीज फ्रॉम इंडियाज पुअरेस्ट डिस्ट्रिक्ट्स' या शीर्षकाने १९९५ साली पुस्तक प्रकाशित केले.त्यांच्या या ग्रंथातील ग्रामीण भागातील वंचितांची करुण कहाणी,जणू तत्कालीन समाजाचे जीवनचरित्रच जगासमोर उभे करते.या लेखांत त्यांनी गरिबांचे मूळ दुःख व दारिद्य केवळ अवर्षणात नसून निरक्षरता, जातिभेद आणि बेकारी हेही घटक तितकेच त्यास कारणीभूत आहेत,हे निदर्शनास आणले.या पुस्तकाच्या अनेक आवृत्त्या निघाल्या असून त्याला तेरा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार लाभले आहेत.
'द हिंदू' या इंग्रजी दैनिकाने त्यांची नियुक्ती ग्रामीण भागातील समालोचन करणारा संपादक (रूरल अफेअर्स एडिटर) म्हणून केली असून,त्यासाठी ते वर्षातील जवळजवळ २७० –३०० दिवस विविध राज्यातील ग्रामीण भागांत भ्रमंती करतात.
प्रसारमाध्यमे समाजाच्या उच्च स्तरातील पाच टक्के लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम करीत असतील,तर तळागाळातील पाच टक्के गरीब लोकांच्या समस्यांना मी वाचा फोडण्याचे काम करतो, असे त्यांचे म्हणणे आहे.
रेमन मॅगसेसे पुरस्काराच्या पत्रकात (सायटेशन) म्हटले आहे की, ‘त्यांनी (साईनाथ) पत्रकार म्हणून भारताच्या गरीब जनतेचे विविध प्रश्न आस्थापूर्वक बांधीलकीने जगासमोर मांडले’.नोबेल पुरस्कार मानकरी भारतीय अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन साईनाथांविषयी म्हणतात की, ‘ही इज वन ऑफ द वर्ल्डस् ग्रेट एक्सपर्टस् ऑन फॅमिन अँड हंगर’.पी.साईनाथ यांनी
रेमन मॅगसेसे पुरस्काराची रक्कम विदर्भातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना देण्याचे औदार्य दाखविले आहे, इतकेच नव्हे तर नांदेडमधील डाव्या चळवळीतील माझे काॅम्रेड मित्र गंगाधर गायकवाड यांनी पेडन्युज प्रकरणात अल्पावधीत महत्त्वाची माहिती पी.साईनाथ दिली.या कारणामुळे कॉ.गंगाधर गायकवाड हे अनेक अडचणीचा सामना करीत असताना त्यांना थेट राष्ट्रीय पातळीवरून आधार देत मदत करून,टोकाचे पाऊल उचलण्यापासुन परावृत्त केले व आजही त्यांच्या सुखा दुःखाची ते अधूनमधून माहिती घेत असतात.
अशा संवेदनशील मनाच्या व्यक्तीमत्वाचे पुनश्च मन:पुर्वक बि मिडीया माध्यम समुहाकडून अभिनंदन.!!

0 Comments