राज्यातील आघाडी सरकार शेतकरी हिताविरोधी- प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे

लातूर / प्रतिनिधी : शेतकऱ्याना केंद्र बिंदू मानून केंद्रातील नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने शेतकरी सन्मान योजनेसह शेतकऱ्याच्या हिताचे अनेक महत्वपूर्ण निर्णय घेवून दिलासा देण्याचे आणि आर्थिक प्रगतीच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले. मात्र राज्यातील आघाडी सरकारने शेतकऱ्याना कसलीच मदत केली नाही उलट पीक विम्याचे निकष बदलून विमा कंपन्यांना मालामाल केले. खऱ्या अर्थाने राज्यातील ठाकरे सरकार शेतकरी हिताविरोधी आहे असे प्रतिपादन भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे यांनी लातूर येथे बोलताना केले. 
           भाजपा किसान मोर्चाच्या वतीने राज्यव्यापी शेतकरी संवाद अभियान सुरु करण्यात आले असून या निमित्ताने गुरुवारी लातूर येथील प्रणवश्री मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात वासुदेव काळे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ.रमेशअप्पा कराड हे होते तर याप्रसंगी आ.अभिमन्यू पवार किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस मकरंद कोरडे, सुधाकर भोयर, भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे, जिल्हा सरचिटणीस संजय दोरवे, त्र्यंबक गुट्टे, रामचंद्र तिरुके, अशोक केंद्रे, सौ.शामल कारामुंगे, शिवाजी केंद्रे, विजय क्षिरसागर, जि.प.सभापती रोहिदास वाघमारे, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष साहेबराव मुळे, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा श्रीमती रेखाताई तरडे, युवामोर्चाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर चेवले, अमोल पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. 
         *भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या सुचनेनूसार या कार्यक्रमात भाजपा किसान मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीसपदी दिलीपराव देशमुख, प्रदेश चिटणीस अनिल केंद्रे, भाजपा लातूर जिल्हा सरचिटणीसपदी किरण उटगे, जिल्हा प्रभारी संतोषअप्पा मुक्ता, मच्छिमार सेलच्या जिल्हा संयोजक ब्रम्हदेव सोनेवाड, किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीस बळवंत पाटील आणि महिला मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी सोनाली गुळभिले यांची नियुक्ती करण्यात आली* असून त्यांना किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ.रमेशअप्पा कराड, आ. अभिमन्यू पवार यांच्या हस्ते सत्कार करून नियुक्तीपत्र देण्यात आले. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात ओबीसी आरक्षण प्रश्नावरुन आक्रमक भूमिका मांडल्या बद्दल सत्ताधारी पक्षाने निलंबित केलेल्या  *आ.अभिमन्यू पवार यांचा लातूर जिल्हा भाजपाच्या वतीने सत्कार करुन गौरव करण्यात आला.*
        या शेतकरी संवाद अभियानात आ रमेशआप्पा कराड आणि आ अभिमन्यू पवार यांनी राज्यातील आघाडी सरकारच्या कारभारावर कडाडून टीका केली जिल्हाभरातील किसान मोर्चासह भाजपाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.