राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे घंटानाद आंदोलन
देवणी दि.12 जुलै 2021 : संविधान संपवून बहुजनांचे प्रतिनिधित्व संपवणा-या या राज्य व केंद्र शासनाने जाणीवपूर्वक मागास प्रवर्गाततील शासकीय व सार्वजनिक सेवेतील कर्मचारी यांचे पदोन्नतीतील प्रतिनिधित्व संपवू सेवेतील कर्मचारी यांचे पदोन्नतीतील प्रतिनिधित्व संपवू पाहत आहे.शिक्षण व नोकरीतील प्रतिनिधित्व धोक्यात आणले आहे.ओबीसीतील प्रतिनिधित्व संपविण्याचे धोरण आखले आहे. शासकीय आणि अनुदानित आस्थापनांमध्ये भरती न केल्यामुळे बेकारी वाढली आहे. कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना बंद करून डीसीपीएस व एनपीएस सारखी कुचकामी योजना लागू केली आहे. अन्यायकारक शेतकरीविरोधी केंद्रीय कायदे लागू केले आहेत. मराठा समाजाला आरक्षणाचे गाजर दाखवत आहे हे सरकार. शिक्षण सेवक, सी एच बी,कंत्राटी पद्धत अमलात आणून सुशिक्षित तरुणांच्या आयुष्याशी खेळत आहे .अशा विविध अन्याय अत्याचार करणाऱ्या सरकारच्या धोरणाचा राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ व सहयोगी संघटन .बामसेफ ,प्रोटान, भारत मुक्ती मोर्चा, मुस्लिम मोर्चा, बहुजन मुक्ती पार्टी इत्यादी सहयोगी संघटनांच्या वतीने देवणी तहसील कार्यालय या ठिकाणी *प्रतिनिधित्व बचाव लोकतंत्र बचाव* आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्यात *घंटानाद आंदोलन* करून शासनाच्या विविध अन्यायकारक धोरणांचा निषेध करण्यात आला.

0 Comments