वसमत / प्रतिनिधी : तालुक्यातील हयात नगर येथे नुकतीच हिंगोलीचे गटशिक्षणाधिकारी घाडगे पाटील यांनी भेट दिली. कोरोना संकट काळात अनेक जणांना जीव गमवावा लागला. हयात नगर परिसर हिरवाईने नटवून पाच हजार झाडे लावण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन घाडगे पाटील यांनी दिले. त्यांच्यासोबत गटशिक्षणाधिकारी तानाजी भोसले सर यांनी संकटाच्या काळात जी माणसं खंबीरपणे उभि टाकतात तेच माणसं इतिहास निर्माण करू शकतात. असा विश्वास सरपंचाला दिला. यावेळी सरपंचांनी हयातनगर परिसर हिरवाईने नटण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे सरपंच लक्ष्मणराव डोके यांनी सांगितले. या कार्यक्रमासाठी उपसरपंच नागनाथ कदम व सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. त्याचबरोबर केंद्रप्रमुख ढोरे सर मुख्याध्यापक सोळंके सर मुख्याध्यापक नरवाडे सर व सर्व शिक्षक वृंद या कार्यक्रमासाठि उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सोमनाथ राऊत यांनी केले.

0 Comments