उदगीर / प्रतिनिधी : सौ.मधुमती कनशट्टे या लातूर येथील युवा परीवर्तन एरिया मॅनेजर आहेत. कोरोनाच्या संकट काळात प्रशासनाने ठरवून दिलेल्या नियमा प्रमाणे सर्व नियम व अटी याचे पालन करून, कोरोना संकट काळात मदत देण्याचे कार्य त्यांनी केलेले आहे. त्यांनी कोरोनाच्या संकट काळात उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. कोरोनाच्या संकट काळात त्यांनी संपूर्ण भारतातून आर 4 ग्रुपला सन्मान प्राप्त करून दिल्याबद्दल, नागपूर येथील कार्यक्रमात युवा परीवर्तन मॅनेजमेंट टीमने त्यांचा गौरव व सन्मान करून, त्यांना सन्मानित केलेले आहे. उदगीर येथील टिमला नेहमीच मोलाचे सहकार्य करून, वेळोवेळी मार्गदर्शन पण त्यांचे लाभलेले आहे. म्हणूनच त्यांना हा सन्मान प्राप्त झालेला आहे. याचे औचित्य साधून, या सत्काराचे उदगीर येथे आयोजन केलेले होते. उदगीर येथील युवा परीवर्तन टीमच्या वतीने मधुमती कनशट्टे यांचा हा सत्कार नुकताच आनंदमय वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमाला युवा परीवर्तन टीमच्या वतीने उषा माने, रंजना बोंडगे, शिवानंद सूर्यवंशी, आरती सूर्यवंशी, भाग्यश्री बिरादार, सुमन पवार, उषा वाघमारे, आरिफ सय्यद, संतोष भुताळे, विकास कांबळे, श्यामल उलीगडे, ज्योती पाटील इत्यादी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युवा परीवर्तन टीमने विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.

0 Comments