सामाजिक बांधिलकी व ऋण जपणारा नेता -माजी आमदार डॉ सुधाकर भालेराव
----------------------------------
देवणी : राजकारणात अनेक चढ उतार पाहिले परंतु सामाजिक बांधिलकी व ऋण माजी आमदार सुधाकरजी भालेराव यांनी कधी विसरले नाहीत त्यामुळे त्यांचा समाजात असलेला मान सन्मान प्रतिष्ठा थोडीही कमी झाली नाही  सत्ता संपत्तीच्या हाव्यासापोटी मनुष्य समाजापासून दूर जातो ज्या माणसापासून समाज दूर जातो  त्या माणसाची किंमत झिरो होते  परंतु सुधाकर भालेराव यांनी आयुष्याची सुरुवात सामाजिक संघटनेच्या माध्यमातून संघर्षमय पद्धतीने केली आहे त्यांना समाजापासून दूर जाण्याचा प्रश्न चं उद्भभत नाही सामाजिक अन्याय अत्याचाराचे अनेक घाव त्यानी झेललेे सोसले भोगले  आपल्या कर्तव्यापासून थोडेही विचलित न होता फुले शाहू आंबेडकर अण्णा भाऊ साठे या महापुरुषांच्या आदर्श विचारांचा वारसा घेऊन समाजच माझा करता करविता म्हणून समाजाला अग्रस्थानी ठेऊन समाजाचे हित जोपासणारा एक धुरंधर नेता म्हणजे डॉ सुधाकर भालेराव हे होत
  ज्या समाजात  जन्मलो त्या समाजाचं काहीतरी देणं लागतो ह्या भावना कोठेतरी काळजाला भिडतात तेव्हा तो सामाजिक उद्धारातील चळवळीतील अनुरेणू बनून तो सामाजिक कार्य करतो तेव्हा सामाजिक क्रांती नक्कीच घडत असते  प्रवाहाच्या विरोधात जाऊन डॉ सुधाकर भालेराव यांचे काम शंभर टक्के उल्लेखनीय आहे
  भालेराव यांची कुशाग्र बुद्धी अभ्यासु वृत्ती विविध प्रश्नांवर सविस्तर मांडणी  जिद्द संघटन कौशल्य  सर्वसंपन्न नेता  विधानभवनात वेळोवेळी संघर्ष करताना आपण पहिला आहे तो सामाजिक संघर्ष असो राजकीय असो  विकासाच्या दृष्टीने केलेला संघर्ष असो नेहमी विरोध कावर तुटून पडले भालेराव आपण सभागृहात पाहिले आहेत विकासाच्या दृष्टीने निधी मागून मिळत नसेल  भालेराव यांनी हिसकाहून आणले आहे सभागृहात अनेक प्रश्नांवर मांडणी करून त्यात आपल्या बुद्धी कौशल्याच्या जोरावर डॉक्टर पदवी प्राप्त केली आहे ठाणे मुंबईत तील अथांग सागरातील नौकेतील प्रवाशी आहे समुद्राच्या अनेक भरती ओहोटी च्या अनेक लाटा त्यांनी पहिल्या आहेत मायामोह मुंबई नगरीत साम दाम दंड भेद सर्व काही पाहिले आहे सर्व काही सुखसपन्न असताना समाजसेवा करण्याची इच्छा काही गप्प बसू देईना अनेक संघर्षातून डॉ सुधाकर भालेराव यांचे  स्वप्न समाजाच्या आशिर्वादाने साकार झाले अक्षरशः दहा वर्षे लोकांची अविरत सेवा केली उदगीर मतदारसंघात विकासाचा डोंगर उभा केला तिसऱ्यांदा आमदार होणार कोणाच्या स्वार्थासाठी  भालेराव यांचा राजकीय बळी गेला ' तेव्हा समाजात जाऊन माझं काय चुकलं असा प्रश्न समाजाला घेऊन राजकीय नेत्यांना विचारला तेव्हा संपूर्ण समाज संपूर्ण ताकतीने सुधाकर भालेराव यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा होता  यालाच सामाजिक बांधिलकी व ऋण न विसरणारा नेता म्हणजे डॉ सुधाकर भालेराव हे आहेत 
---गिरीधर गायकवाड
     नागराळकर