प्रहार जनशक्ती पक्षाच्या उदगीर-जळकोट विधानसभा अध्यक्ष पदी सूर्यभान चिखले शेल्हाळकर यांची निवड

उदगीर / प्रतिनिधी : तालुक्यातील शेल्हाळ येथील सामाजिक कार्यकर्ते तथा जनसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हिरहिरीने भाग घेणारे सर्व सामान्यातील नेतृत्व आसलेले सूर्यभान चिखले शेल्हाळकर यांची राज्याचे लोकप्रिय मंत्री ना.बच्यूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखालील जनसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी स्थापन करण्यात आलेला पक्ष म्हणजे प्रहार जनशक्ती पक्ष या पक्षाच्या उदगीर-जळकोट विधानसभा अध्यक्षपदी लातूर जिल्हा अध्यक्ष व उपाध्यक्ष विनोद भाऊ तेलंगे यांनी नूकतीच निवड केली आहे.
      सदर निवड महाराष्ट्र संंपर्क प्रमुख प्रमोद भाऊ कुदळे,महाराष्ट्र कार्याध्यक्ष बलूभाऊ जवंजाळ, यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ चौगुले यांच्या आदेशानुसार जिल्हा उपाध्यक्ष विनोद तेलंगे, उदगीर तालुका अध्यक्ष रविकिरण बेळकूंदे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.
     या वेळी शहराध्यक्ष रियाज शेख,तालुका उपाध्यक्ष संदिप पवार, महादेव मोतीपवळे,सुनील केंद्रे, चंद्रकांत भोसगे,बालाजी बिरादार, निळकंठ मुदोळकर,अभय कुलकर्णी, गोपाळ नवरखेले,संगम वडले,रवी आदेप्पा,लखन कांबळे, सुदर्शन सुर्यवंशी, कांचन भोसगे,विजयमाला पवार, सुजाता दावरे,शकुंतला रोडेवाड,लता कोळी,जयश्री चव्हाण, शिलावति बिरादार,विजयमाला हारगे,कुमोंदिनी पांचाळ, रचना हल्लाळे,यांच्या सह असंख्य प्रहार जनसेवक उपस्थित होते.
    या निवडीमुळे उदगीर-जळकोट विधानसभा मतदार संघात आनंद व्यक्त केला जात आहे.