हयात नगर येथील पाचही अंगणवाड्यात  विद्युत रोषणाई.

वसमत / प्रतिनिधी : तालुक्यातील हयात नगर येथील पाचही अंगणवाड्यात  विद्युत रोषणाई. गावचे सरपंच  लक्ष्मणराव डोके.. यांचा विकास कामाचा धडाका सुरूच. वसमत तालुक्यातील हयात नगर येथील पाचही अंगणवाड्यात विजेचा प्रश्न निर्माण झाला होता.
       काही दिवसांपूर्वी अंगणवाडी ताईंनी हा प्रश्न सरपंचांना सांगितला. त्याची दखल घेत आज या कामाचे उद्घाटन करण्यात आले . यावेळी  गावचे सरपंच लक्ष्मणराव डोके. उपसरपंच नागनाथ कदम तंटामुक्ती अध्यक्ष रुस्तुम आप्पा राऊत. ब्रह्माजी खाडे . वैजनाथ गोडबोले. सोमनाथ राऊत. सुरेश महाराज गिरी. ज्ञानेश्वर सोळंके अयुब खान पठाण. मोहनराव सारंग. विनोद भाऊ अंभोरे. या सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या सहकार्याने गावात आणखी एका विकास कामाची भर पडली. कोरोनाचा संकटकाळात गावच्या पाण्याचा प्रश्न बरोबर . दलित वस्तीच्या विकास कामाला सुरुवात झाल्यामुळे. गावच्या विकासाला नवी दिशा मिळेल असा विश्वास आता गावकरी व्यक्त करत आहेत.