तारांकित प्रश्न

पत्रकार दैनिक साप्ताहिक वेब मिडीया होकल मिडीया असो किंवा इतर जे काही साधनामार्फत जनतेपरतं सत्य घटना  पोहचवण्याचे मार्ग आपण दैनदिन करित असतो! 
    ह्या सर्व मार्गाचे चालक मालक पत्रकार संस्थांपक अध्यक्ष जनतेला न्याय मिळविण्यासाठी शोध पत्रकारिता करून महत्वपुर्ण न्यूज जनतेपरतं पत्रकारितेच्या संसाधानामार्फेत पोहचवीत असतात! नेमकी परिस्थिती इतकी बिकट होत आहे! की शासक वर्ग रोज नवनवीन शर्ती अटी टाकुन जनतेवर क्रुर संविधान विरोधी हस्तक्षेप करून नवीन नियम लादत आहेत! 
       भविष्यात आणि आजपासुन यांचे परिणाम दिसत असुन सुध्दा आपण त्याकडे गांभीर्याने पाहात नाही! शासक वर्ग रोज जिवनावश्यक वस्तुचे भाव वाढवित आहे!आपण चर्चा कोणती करावी आणि कोणती करु नये !ते आपल्या हातात आहे!पण-- भविष्यात शासक वर्ग याच मार्गाने जनतेच्या विरोधी चालत राहिल्यास त्याचे परिणाम गंभीर स्वरुपाचे होतील!कारण आम्ही निवडुण दिलेले प्रतिनिधी हे संसदेमध्ये विधानसभेत राज्यसभेत कायदे तयार होतात!त्यावेळेस बोलत नाही!मुकाट्याने सह्या करतात .!! तर येणारा काळ तुम्हाला आम्हाला गुलामीचा असेल.!