प्रोटानचे 'प्रतिनिधीत्व बचाओ ,लोकतंञ बचाओ आंदोलन' काळी फित लावून करण्यात आले
देवणी / प्रतिनिधी : देवणी तालुक्यातील सर्व पदाधिकारी तहसील कार्यालयात दि.7जुलैमराठा आरक्षण,अंगणवाडी कर्मचारी यांना नियमीत वेतनश्रेणी,शेतकरी विरोधी धोरण रद्द करणे,ओ.बी.सी.आरक्षण,विविध आस्थापनामधील पदभरती संदर्भात,अशा एकूण 14 विविध मागण्यासाठी देवणी येथे राष्ट्रीय मुलनिवासी बहूजन कर्मचारी संघ अंतर्गत प्रोटानच्या वतीने तहसीलदार सुरेश घोळवे याना निवेदन देण्यात आले प्रतिनिधीत्व बचाओ ,लोकतंञ बचाओ .तालूकाभर आंदोलन करण्यात आले यावेळी प्रोटान चे सर्व पदाधिकारी तसेच प्रोटान चे विभागीय सचिव प्रा.डाॕ.पुरुषोत्तम मोरे सर.भुसावळे सर,आर एम बि के एस चे भैय्यासाहेब देवणीकर सर,तुकाराम रणदिवे, बांधकाम युनियन चे पदाधिकारी लक्ष्मण रणदिवे, बि आर सी चे शेख सर व प्रोटानचे देवणी तालूकाध्यक्ष प्रविण रणदिवे सर उपस्थित होते.आंदोलनाचे पहिले चरण म्हणून काळी फीत लावून तहहसिल ,पंचायत समिती ,शिक्षण विभाग प.स.देवणी व पोलीस स्टेशन कार्यालयात निवेदन संघटनेद्वारे देण्यात आले व येत्या 12 तारखेला घंटानाद व धरणे आंदोलन करण्यात येणार आहे

0 Comments