प्राध्यापकास जातीवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणातील आरोपीचा जामीन अर्ज नामंजुर 
 
सोलापूर / प्रतिनिधी : प्राध्यापकास जातीवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणातील आरोपीचा जामीन अर्ज   विद्यमान कोर्टाने  नामंजुर केला आहे.
         यांत थोडक्यात हकिकत अशी की,गांव कोळेगांव ता.माळशिरस जि.सोलापूर येथील प्राध्यापक श्री.शहाजी.एकनाथ .पारसे.हे त्यांच्या मित्रमंडळी व समाजबांधवांशी कोळेगांव ता.माळशिरस येथील मायक्का मंदिराजवळ बोलत बसले असताना कोळेगांव येथील रहिवासी प्रविण उर्फ तात्या अनिल सांवत हा तेथे आला व त्यांने फिर्यादी प्रा.शहाजी पारसे यांना अत्यंत अर्वाच्य भाषेत जातीवाचक शिवीगाळ करुन फिर्यादीची गच्ची पकडुन मारहाण केली व कमरेला अडकवलेला चाकु काढुन तुला भोसकतो  एकेकांच्या आतड्या बाहेर काढतो असे म्हणुन जिवेमारण्याची धमकी दिली,त्यामुळे प्राध्यापक पारसे यांनी वेळापुर ता.माळशिरस येथील पोलीस स्टेशन येथे ता.१०/०६/२०२१ रोजी फिर्याद दिली होती सदर फिर्यादीवरुन आरोपी प्रविण उर्फ तात्या अनिल सांवत याच्या विरुध्द अनुसुचित जाती आणि अनुसुचित जमाती(अत्याचार प्रतिबंधक ) अधिनियम चे कलम ३(१)(r) व ३(१)(I)(s) व ३(२) (v)(a) तसेच भारतीय दंड संहिता१८६०चे कलम-३२३,५०४,५०६ व महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१चे कलम १३५ प्रमाणे वेळापुर पोलीसस्टेशन येथे गुन्हा रजीस्टर नंबर १९३/२०२१ प्रमाणे आरोपी विरूध्द ता.१०/०६/२०२१रोजी गुन्ह्याची नोंद होऊन त्याच दिवशी आरोपी प्रविण उर्फ तात्या अनिल सावंत यांस अटक करण्यात आली होती,सदर गुन्ह्यातुन जामीन मिळावा म्हणुन मे.माळशिरस येथील कोर्टासमोर प्रविण उर्फ तात्या अनिल सावंत यांच्यावतीने जामीनअर्ज ठेवण्यात आला होता,सदर जामीन अर्जास मुळफिर्यादी प्रा.पारसे यांचेवतीने ॲड.डी.एन.भडंगे.व ॲड.एन.एन.भडंगे रा.सोलापूर यांचे कडुन आरोपीप्रविण उर्फ तात्या अनिल सावंत हा गुंडप्रवृत्तीचा असुन त्याच्यावर अन्य गुन्हे दाखल आहेत असे मे.कोर्टाच्या निदर्शनास आणुन तिव्र विरोध दर्शवुन सदर जामीनअर्जास सक्त विरोध केला होता,तर सदर प्रविण उर्फ तात्या अनिल सावंत याच्यावतीने तो ता.१०/०६/२०२१ पासुन न्यायालयिन कोठडीत असुन तो त्याच्या कुटुंबाचा कुटुंबकर्ता असुन त्याच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे,आरोपीने कोणताही गुन्हा केलेला नाही असा युक्तिवाद  मांडला परुंतु मे.कोर्टाने मुळफिर्यादीची हरकत व त्यांच्यावतीने मांडलेला युक्तीवाद ग्राह्य धरून माणुन आरोपी प्रविण उर्फ तात्या अनिल सावंत याचा जामीनअर्ज मे.सेशन जज्ज श्रीयुत पाटीलसाहेब यांनी ता.०५/०७/२०२१ रोजी फेटाळला.यांत मुळफिर्यादीच्यावतीने ॲड.डी.एन.भडंगे व ॲड.एन.एन.भडंगे यांनी तर सरकारीवकिल श्री.संग्राम.पाटील यांनी काम पाहिले