शेतकरांची ऊस बिले व कामगारांच्या पगारी 
त्वरीत द्या

मोहोळ / प्रतिनिधी : बळीराजा शेतकरी संघटना..मागणी बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने पाच तारखेला मोहोळ तहसीलवर भीमा सहकारी साखर कारखान्याच्या ऊस बिल व कामगारांच्या पगारी साठी बेमुदत धरणे आंदोलन असल्याने या आंदोलनासंदर्भात मोहोळ तहसीलदार जिवन बनसोडेसाहेब यांनी कारखान्याचे प्रशासन व बळीराजा शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यांची बैठक आयोजित केली होती.
 साधारणपणे दोन तास चालू असलेल्या बैठकीतून  चर्चेतून असा विषय पुढे आला की आम्ही शेतकऱ्याची सर्व देणे पंधरा दिवसाच्या आत देऊ असं कारखानदारांचे म्हणणं आहे परंतु संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी यांना ठणकावून सांगितले की शेतकऱ्यांची सर्व देणी आठ दिवसांत आत द्यावी अन्यथा उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात‌ येईल याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील या बैठकीस मोहोळ चे तहसीलदार जिवन बनसोडेसाहेब  भीमा सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन सतीश जगताप व कार्यकारी संचालक शिंदे तसेच बळीराजा शेतकरी संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष नितीन बागल सोलापूर जिल्हाअध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली जवळेकर जिल्हा उपाध्यक्ष रमेश भोसले तसेच नूतन जिल्हाउपाध्यक्ष रामदास खराडे, मोहोळ तालुकाअध्यक्ष विठ्ठल ढेकळे, काकासाहेब मुळे, पंढरपूर तालुकायुवाअध्यक्ष औदुंबर सुतार, नानासाहेब मुळे, बाळासाहेब मुळे, सुजित मोठे,प्रकाश भोसले, बालाजी शेकळे,तानाजी सोनवले, विकास खराडे,शेखर कोरके, नितीन गावडे,रमेश लंगोटे, रामेश्वर झांबरे, रणजित शिंदे तसेच ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते....